Nitin Gadkari and Supriya Sule
Nitin Gadkari and Supriya Sule Sarkarnama
विदर्भ

MP Supriya Sule : सुप्रिया सुळेंना यासाठी झाली नितीन गडकरींची आठवण…

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे नुकतेच एक्सप्रेस वे वर अपघाती निधन झाले. तो विषय अजूनही गाजतोय. त्यांच्या चालकाला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू आहे. पण एकदा जीव गेला, तो गेलाच, परत येणे नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) याबाबतीत नेहमी अलर्ट असतात आणि देशाच्या जनतेला वेळोवेळी आपल्या विभागाच्या माध्यमातून सजग करीत असतात.

यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना आज विचारले असता, त्या म्हणाल्या, रस्ता सुरक्षा हा विषय आपण सर्वच जण सामान्यपणे घेतो. काल मी पण स्वतः एक्सप्रेस वे वर सीट बेल्ट लावला. तो नेहमीच मी वापरते. अशा घटना घडल्या की सर्व लोक ८ दिवस तरी सर्व नियम पाळतात. मग रुटीन सुरू झाले की सर्व विसरतात. पण ही एक राष्ट्रीय मोहीम झाली पाहिजे. आपले केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी नेहमी या गोष्टींबाबत आग्रही असतात आणि देशाच्या रस्ते अपघाताची संख्या घटावी किंबहुना अपघात होऊच नये, यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.

आज मला आर. आर. पाटलांची (R. R. Patil) प्रकर्षाने आठवण येते. ते गाडीत बसताना नेहमी सीट बेल्ट लाऊन बसायचे. त्या काळात तर याबाबत येवढी जनजागृती नव्हती. पण तरीही ते नेहमी काळजी घ्यायचे. त्यांचे अनुकरण आमचे कार्यकर्तेही करायचे. आबांचे जुने फोटो, व्हिडिओ बघा, त्यामध्ये दिसेल की, ते नेहमी पुढच्या सीटवर बसायचे, खिडकीचा काच खाली असायचा आणि ते सीट बेल्ट लावून असायचे. रस्ता सुरक्षा हा विषय आपण सर्वच जण अगदी सामान्यपणे घेतो. रस्ता सुरक्षेबाबत एक धोरण असावे, असे आम्ही नेहमी सभागृहामध्ये बोलतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आम्हा सर्वांना सकारात्मक प्रतिसाद देतात. आमचे प्रयत्न सुरूच असतात, पण ही एक राष्ट्रीय मोहीम झाली पाहिजे, असे खासदार सुळे म्हणाल्या.

या गोष्टी करताना खूप लहान लहान वाटतात, पण त्याचे महत्व मोठे आहे. विनायक मेटे हे अतिशय महत्वाचे नेते रस्ते अपघातात आपल्यातून निघून गेले. येवढा मोठा आघात झाल्यानंतर या सर्व गोष्टी आपल्या लक्षात येतात. वेळेपूर्वीच आपण सर्वांना खबरदारी घेतली, तर अशा घटना आपल्याला टाळता येतील आणि सर्वांनीच ही काळजी घेतली पाहिजे. असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT