Narendra Bhondekar and Sushma Andhare Sarkarnama
विदर्भ

Sushma Andhare : सुषमा ताईंनी ओवाळावे; आम्हीही साडी, चोळी देऊन सन्मान करू...

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी सुषमा अंधारे यांना टिका करण्यासाठी महाराष्ट्रात सोडलेले आहे.

Abhijit Ghormare_Guest

MLA Narendra Bhondekar News : उद्धव ठाकरेंनी सुषमा अंधारे यांना टिका करण्यासाठी महाराष्ट्रात सोडलेले आहे. टिका करताना त्या अर्धवट माहितीच्या आधारे करतात. मी त्यांना ताई म्हणतो आणि त्यांनी ‘भावाला भेटायला चालली आहे’, असे म्हटलेले आहे. त्यांनी भर सभेत ओवाळावे, आम्हीही साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान करू, अशा शब्दांत अपक्ष आमदार आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटात असलेले नरेंद्र भोंडेकर यांनी अंधारेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

गोंदियामध्ये (Gondia) सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी जे वक्तव्य केले, ते साफ चुकीचे आहे. गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या बदलीची प्रक्रिया उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात प्रस्तावित झाली होती. सभागृहात माहिती दिल्यानंतर गृहमंत्र्यांनी बदलीच्या त्या प्रस्तावावर सही केली आहे. म्हणजे बदलीचा निर्णय ठाकरे सरकारच्याच काळात झाला होता, त्याची अंमलबजावणी मात्र या सरकारच्या काळात झाली. सुषमा ताईंना याची माहिती नाही. म्हणूनच त्या काल काही ना काही बरळत होत्या, असे आमदार भोंडेकर (Narendra Bhondekar) म्हणाले.

केवळ भाषणबाजी करून, कुणावर टिका, टिप्पणी करून चालत नाही. म्हणूनच सुषमा ताईंना माझे सांगणे आहे की, त्यांनी एखादी निवडणूक लढावी. नाही आमदारकीची, तर जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा नगरसेवकाची तरी निवडणूक त्यांनी लढावी. जेथून तिकीट मिळेल, तेथून त्यांनी लढावे. म्हणजे लोकांचे प्रश्‍न काय असतात ते त्यांना कळेल. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते अगदी काल पर्यंत तुमच्या विचारांत जे परिवर्तन झाले, ते त्यांनी आजच्या सभेत सांगायला पाहिजे. ‘गर्व से कहो हम हिंदू है’, हे बाळासाहेबांचे विचार त्यांनी खरंच स्वीकारले का, याचेही उत्तर त्यांनी द्यावे, असे आमदार भोंडेकर म्हणाले.

तुम्ही विदर्भात आल्यावर जय विदर्भ म्हणू शकता का, नाही तर विदर्भात पाय ठेवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. विदर्भाला लुटून मुंबई वाचवण्याचा प्रयत्न तुम्ही दर वेळी करता. विदर्भाच्या बाबतीत तुमचे व्हिजन काय, असे प्रश्‍न आमदार भोंडेकर यांनी अंधारे यांना विचारले आहेत. यापूर्वी तुम्ही बाळासाहेबांवर काय टिका केल्या, त्याची माहिती त्यांनीच घेण्याची गरज आहे. यू ट्यूब वर त्यांचेच व्हिडिओ त्यांना काढून बघावे, असा सल्लाही आमदार भोंडेकर यांनी सुषमा अंधारे यांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT