Crime  Sarkarnama
विदर्भ

Buldhana News: दोन गटात हाणामारी; 'स्वाभिमानी'चे जिल्हाध्यक्ष जखमी...

Swabhimani Farmers Association: घटनेचा व्हिडिओ व्हायरल

सरकारनामा ब्यूरो

Buldhana: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. जागेच्या जुन्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मेहकर तालुक्यातील डोनगाव येथे जागेच्या जुन्या वादातून दोन गटात तुफान राडा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेत चार ते पाच जण जखमी झाले आहेत. या घटनेत कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी डोनगाव पोलिस ठाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले,देवेंद्र आखाडे, वैभव आखाडे यांच्यासह पाच जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले .

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ज्ञानेश्वर टाले, 'स्वाभिमानी'चे पदाधिकारी गजानन सातपुते यांच्या ताब्यात असलेल्या दुकानाचा ताबा घेण्यासाठी काही जण बळजबरीने दुकानात घुसले असता हा राडा झाला झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत महिलांना सुद्धा मारहाण झाली आहे. घटनेत ज्ञानेश्वर ताले जखमी आहेत. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. गजानन सातपुते यांच्यासह सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT