ravikant tupkar
ravikant tupkar sarkarnama
विदर्भ

'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांना अटक; आंदोलनात 'हाय होल्टेज' नाट्य

सरकारनामा ब्युरो

नागपूर : कापूस-सोयाबीन प्रश्नावर बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते (swabhimani shetkari sanghatana) रविकांत तुपकरांनी (ravikant tupkar) बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू केलं होत. त्यांना रात्री उशीरा नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. तुपकर यांच्या अटकेमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तुपकर यांनी पोलिस कोठडीत अन्नत्याग आंदोलन सुरुच ठेवले.

बुधवारी रात्री नागपूर पोलिसांनी रात्री ही अटक केली. कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावर रविकांत तुपकरांनी (ravikant tupkar) नागपुरात बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला सुरू केलं होत. मात्र, नागपुरातील तुपकरांच्या आंदोलनात 'हाय होल्टेज' नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. अटक केलेल्या तुपकरांना रातोरात पोलिस बंदोबस्तात बुलढाण्याकडे रवाना करण्यात आलं आहे.

तुपकर यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी काल सकाळपासून अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला होता. 144 कलम आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून नागपूर पोलिसांनी त्यांना आंदोलनातून रात्रीच ताब्यात घेतलं होतं.

प्रकृती खालावलेल्या तुपकरांना जबरदस्तीने उपचारांसाठी नागपुरात दवाखान्यात नेण्यात आल्याचे समजते. तुपकरांनी उपचारास स्पष्ट नकार देत आपलं अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवलं. अखेर सरकारने तुपकरांना रातोरात जबरदस्तीने पोलिस बंदोबस्तात बुलडाण्याकडे रवाना केलं.

''नागपूर शहरात संचारबंदीमुळे आमच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे. मग कर्फ्यू आदेश लागू असताना तुम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी दिली,," असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT