Tekchand Sawarkar, Bacchu Kadu and Devendra Bhuray Sarkarnama
विदर्भ

Grampanchayat : अमरावती जिल्ह्यात देवेंद्र भुयार आणि बच्चू कडूंनी राखली आपली गावे…

Bacchu Kadu : या तिन्ही आमदारांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना सरपंचपदी निवडून आणले आहे.

सरकारनामा ब्यूरो

ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणजे अतिशय चुरस. यामध्ये गावातील नेत्यांपुढे मोठे आव्हान निर्माण होते. त्यामुळेच विधानसभेची निवडणूक परवडली, पण ग्रामपंचायतीची निवडणूक नक्को रे बाबा… असे म्हणण्याची वेळ येते. त्यामुळे गावाच्या निवडणुकीवर आमदारही बारीक लक्ष ठेऊन असतात.

आज मतमोजणी सुरू असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नागपूर (Nagpur) जिल्ह्याच्या कामठी विधानसभा मतदारसंघाचे आमदार टेकचंद सावरकर, अमरावती (Amravati) जिल्ह्यातील मोर्शी-वरूडचे आमदार देवेंद्र भुयार आणि प्रहारचे फायरब्रॅंड नेते अचलपूरचे आमदार बच्चू कडू (Bacchu) यांच्या कुटुंबातील सदस्य उभे होते. या तिन्ही आमदारांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना सरपंचपदी निवडून आणले आहे. विधानसभेत प्रतिनिधित्व करीत असलो तरी गावाकडे दुर्लक्ष करीत नाही, असा संदेश या तीन आमदारांनी दिला आहे.

अमरावती जिल्ह्यात अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि वरूड-मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. दोन्ही आमदारांनी आपआपली गावे साबूत ठेवली आहेत. बच्चू कडूंचे मूळ गाव बेलोरा येथे त्यांचे मोठे भाऊ भैय्यासाहेब कडू सरपंचपदी विजयी झाले. १३ पैकी ९ जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले. देवेंद्र भुयार यांच्या मोर्शी-वरूड तालुक्यातील गव्हाणकुंड या गावात त्यांनी वर्चस्व कायम राखले आहे.

अमरावती जिल्ह्यात एकूण २५७ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. यामध्ये ५ ग्रामपंचायती अविरोध निवडून आल्या होत्या. यामध्ये कॉग्रेस समर्थीत पॅनलने ८२ जागांवर विजय मिळविला. भारतीय जनता पक्ष ४८, शिवसेना ८, प्रहार ३२, वंचित १, युवा स्वाभिमान १२, शिंदे गट २, राष्ट्रवादी कॉंग्रेस २०, मनसे ० तर अपक्ष व इतर लहान पक्षांनी ५२ जागांवर विजय मिळविला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT