Chandrashekhar Bawankule, BJP. Sarkarnama
विदर्भ

बावनकुळेंचे टेन्शन गेले : ३३४ मतदार सहलीला पाठवले...

भाजपच्या BJP हालचाली वेगाने सुरू असताना महाविकास आघाडीच्या खेम्यात मात्र शांतता दिसत आहे. असे असताना बावनकुळेंच्या Bawankule समर्थनार्थ आज ३३४ मतदार सहलीला रवाना झाले.

अतुल मेहेरे

नागपूर : नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे आणि ऐन वेळी भाजपमधून कॉंग्रेसमध्ये गेलेले डॉ. रवींद्र ऊर्फ छोटू भोयर यांच्यात चुरस वाढत आहे, असे वाटत असतानाच आज भाजपने आपले ३३४ मतदार सहकुटुंब सहलीला पाठवले. त्यामुळे बावनकुळे यांचा मार्ग मोकळा झाल्याचे भासत आहे.

या निवडणुकीत एकूण ५५६ मतदार मतदान करणार आहेत. त्यांपैकी ३३४ जर भाजपने सहलीला पाठवले, तर उर्वरित २२२ मतदारांचे काय होणार, हा प्रश्‍न मात्र अद्याप अनुत्तरित आहे. सहलीला गेले सर्व मतदार ९ डिसेंबरच्या सायंकाळपर्यंत शहरात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उर्वरित उमेदवारांना अजूनतरी कुणी ‘ॲप्रोच’ झाले नाही, अशी माहिती नागपूर ग्रामीणमधून मिळाली. या निवडणुकीत होणार काय, याची उत्कंठा प्रत्येकाला लागून राहिलेली आहे. भाजपच्या हालचाली वेगाने सुरू असताना महाविकास आघाडीच्या खेम्यात मात्र शांतता दिसत आहे. असे असताना बावनकुळेंच्या समर्थनार्थ आज ३३४ मतदार सहलीला रवाना झाले.

कॉंग्रेसचे उमेदवार छोटू भोयर यांनी विजयाचा दावा केला आहे. भाजपचे सर्व मतदार सहलीला गेले, तर मग भोयर यांच्यासोबत भाजपचे कोणते मतदार आहेत, हा प्रश्‍न उपस्थित होते. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीचा निकाल लागेल, असे कॉंग्रेसच्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्या दिवशीच जाहीर केले. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाबाबत सामान्य नागरिकांसह मतदारांमध्येही तेवढीच उत्कंठा जाणवत आहे.

चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात त्यांनी भरीव कामगिरी केली. नागपूर शहरात जे पट्टेवाटप झाले, ते पट्टेवाटप करण्याचे काम त्यांनी अग्रक्रमाने केले. याशिवाय सर्वपक्षीय नगरसेवकांसोबत बैठका घेऊन झोननिहाय सरकारकडून निधी आणून शहराच्या विकासाला मोठा हातभार लावला. सर्व नगरसेवकांचा आक्षेप असलेली एसएनडीएल नागपुरातून घालवून महावितरण कंपनी आणली.

शहरातून एसएनडीएल घालवण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र आले होते. यासाठी त्यांनी महानगरपालिकेत ठराव घेतला होता. डीपीडीसीतून महानगरपालिकेला कधीच निधी मिळत नव्हता, तो पालकमंत्री असताना बावनकुळेंनी देणे सुरू केले. दरवर्षी १५० कोटी रुपये महानगरपालिकेला मिळत होते. भाजप-शिवसेना युतीच्या काळात जेवढा निधी शहरासाठी आला, त्याचा प्रस्ताव तयार करण्यापासून तर निधी प्राप्त होईपर्यंत सर्व काम करण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची होती, ती पार पाडत पूर्ण वेळ त्याचा पाठपुरावा केला. यामध्ये फुटाळा तलावापासून ते सर्व कामांचा समावेश आहे.

महानगरपालिकेच्या ९४ असे नियम होते, ज्यामध्ये सुधारणा करणे गरजेचे होते. त्या कामाला प्राधान्य देत नियमांमध्ये ९४ सुधारणा करून देण्यात आल्या. ते पालकमंत्री असताना त्यांचा जनता दरबार लोकप्रिय झाला होता. सकाळी दरबार सुरू झाल्यानंतर शेवटच्या माणसाचे काम होईपर्यंत, ते उठत नसत. त्यावेळी सामान्य लोकांची कामे मोठ्या प्रमाणात झाली. विशेष म्हणजे कोरोना संक्रमणाच्या काळात कुठल्याही पदावर नसताना त्यांनी त्या परिस्थितीशी दोन हात करताना चांगले योगदान दिले. नागपूर शहर वगळता जिल्ह्याचाही विकास त्यांनी झपाट्याने केला. त्यामुळे शहरासह ग्रामीणमध्येही त्यांचा जनसंपर्क अजून दांडगा आहे. त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत होईल, असे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT