Goa
Goa Sarkarnama
विदर्भ

कॉंग्रेसची स्पर्धा आता फक्त आपसोबत राहिली आहे...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : गोव्यामध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्ता स्थापन करेल, असे चित्र स्पष्ट झाले आहे. गेल्या वेळी गोव्यात भाजपच्या १३ जागा होत्या, या निवडणुकीत त्या वाढून २० झाल्या आहेत. कॉंग्रेसला आता फार भविष्य उरलेले नाही. कॉंग्रेसची स्पर्धा आता फक्त आपसोबत राहिलेली आहे, असे भाजपचे आमदार संजय कुटे म्हणाले.

आमदार कुटे (Sanjay Kute) म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि शिवसेनेची (Shivsena) गोव्यात वाट लागलेली आहे. आता त्यांच्यावर सर्व लोक हसत आहेत. कारण महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना राजकारणातील एबीसीडीसुद्धा माहिती नाही आणि त्यांना हे लोक गोव्यात (Goa) घेऊन गेले. शिवसेनेचे हे नुकसान खासदार संजय राऊत यांच्यामुळे झाला. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेची वाट लावण्याचा एक कलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

भारतीय जनता पक्ष यापुढे राष्ट्रवादी आणि शिवसेनेला नामोहरम करणार आहे. उत्तर प्रदेशात मोठ्या विजयाकडे आमची वाटचाल सुरू आहे आणि गोव्यात आम्ही सत्ता स्थापन करणार, हे नक्की झालेले आहे. सत्ता स्थापनेचा दावा आम्ही केलेलाच आहे. पण याचा निर्णय आमच्या पार्लीमेंट्री बोर्डात होतो. त्यामुळे ही निर्णय त्यानंतर जाहीर केला जाईल. बेईमानी करून महाराष्ट्रात सत्तेवर आल्यानंतर शिवसेनेला सर्वत्र हिरवे हिरवे दिसू लागले होते. या निवडणूक निकालांनी हवेत उडणाऱ्या त्यांच्या नेत्यांना जमिनीवर आणून आपटले आहे.

२०२४ चे स्वप्न बघू नये..

पाच राज्याच्या निवडणूक निकालाने कॉंग्रेसला त्यांची जागा दाखवून दिली आहे आणि त्यांची साथ घेऊन महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडी स्थापन करून कशीबशी सत्ता मिळविली. या बळावर ते लोक आता २०२४ ची निवडणूक जिंकण्याचे स्वप्न बघून राहिले आहे. पण या निकालानंतर तिन्ही पक्षांनी एकत्र बसून आत्मपरीक्षण करावे. चुका सुधाराव्या आणि २०२४ चे स्वप्न तर बघूच नये, असेही आमदार संजय कुटे आजच्या निकालानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT