Nana Patole
Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Nana Patole : भरकटलेली बोट आणि २६-११ च्या धमकीचा नानांनी सांगितला संबंध…

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : हरिहरेश्वर येथे १८ ऑगस्टला मच्छिमारांना संशयास्पद बोट आढळली होती. मात्र, ही बोट भरकटलेली होती. यामुळे सध्या तरी टेरर ॲंगल नाही, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तेव्हा विधिमंडळात दिली होती. पण भरकटलेली बोट आणि २६-११ सारखा हल्ला करण्याची मिळालेली धमकी, याचा संबंध कॉंग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सभागृहात सांगितला.

भरकटलेल्या बोटीवर शस्त्रास्त्रे आढळ्यामुळे रायगड (Raigad) हरिहरेश्वर येथे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतरही हे प्रकरण पाहिजे तसे गांभीर्याने घेतले न गेल्याने नाना पटोले (Nana Patole) आज सभागृहात संतापले. ते म्हणाले, भरकटलेली नाव दुसऱ्या देशातून आली, असे सांगण्यात आले आणि त्यावर शस्त्रास्त्रही आढळले. त्यामुळे तेथे काही तरी काळेबेरं आहे. केवळ भरकटलेली नाव म्हणून याकडे बघण्यात येऊ नये. ही गंभीर बाब अतिशय गंभीर आहे. ती बोट दुसऱ्या देशातून कशी आली, याबाबत भूमिका अद्यापही मांडली गेली नाही. नाव भरकटणे आणि २६-११ सारखा हल्ला करण्याची धमकी मुंबई (Mumbai) ट्रॅफिक कंट्रोल रुमला येणे, हे दिसते तेवढं सोपं नाही. या प्रकरणाची पूर्ण चौकशी झाली पाहिजे.

हरिहरेश्‍वर येथे आढळलेल्या या बोटीची तपासणी करण्यात आली असून यामध्ये तीन एके-47 आढळल्या आहेत. बोटीची कागदपत्रेही आढळली आहेत. या बोटीचे नाव 'लेडी हान' असून या बोटीचे मालक आस्ट्रेलीयन महिला हाना लॅांडर्स गन असून तिचा पती जेम्स हार्बट हे या बोटीचे कप्तान आहेत. ही बोट २६ जुनला भरकटली होती. ही बोट मस्कतहुन युरोपला जाणार होती. इंजिन फेल झाल्याने १० वाजताच्या सुमारास खलाश्यांनी कॅाल दिला. यास कोरीयन युद्ध नौकेने बोटीतील खलाश्यांची रेस्क्यू करत सुटका केली आणि ओमानला सुपूर्द केले. समुद्र खवळलेला असल्याने या बोटीचे टोईंग करता आला नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी यापूर्वी दिलेली आहे.

असे असे असले तरी परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. भारतीय कोस्टगार्ड व इतर यंत्रणांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. खबरदारी म्हणून यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये कुठलाही टेरर अॅंकल नाही, असेही फडणवीस म्हणाले होते. मात्र, यंत्रणा सतर्क आहेत. दरम्याम सुरक्षेच्या दृष्टीने विचार करता कुठलाही हलगर्जीपणा केला जाणार नसून सुरक्षा यंत्रणा अलर्ट करण्यात आल्या असल्याचे फडणवीसांनी या प्रकरणी सांगितले आहे. त्यावर नाना पटोले यांनी उपरोक्त शंका उपस्थित केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT