Anil Deshmukh, Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis Vs Anil Deshmukh : 'विकास वृत्ती' विरुद्ध 'वसुली बुध्दी' फडणवीस-देशमुखांच्यातील वाद पोहोचला बॅनरपर्यंत

Rajesh Charpe

Nagpur News, 04 August : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात सुरू असलेला वाद, आरोप-प्रत्यारोप आता थेट बॅनरवर झळकले आहेत. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने नागपूरमध्ये एक भले मोठे बॅनर लावले आहे.

त्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसमोर 'विकास वृत्ती' लिहले आहे. तर त्यांच्या शेजारी अनिल देशमुख हे कोठडीत असलेला फोटो लावलेला आहे. देशमुख यांच्या फोटोच्या वर 'वसुली बुद्धी' असं ठळकपणे लिहिण्यात आलं आहे. बॅनरवरच्या मजकुरामुळे सध्या शहरात चांगलीच चर्चा सुरू आहे.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी याची तत्काळ दखल घेऊन एक्सवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यापोस्टमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून भाजप किती खालच्या पातळीवर राजकारण करत आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता देशमुखांच्या या पोस्टवर भाजप काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

श्याम मानव यांनी केलेले खळबळजनक आरोपांपासून फडणवीस आणि देशमुख यांच्यात सुरू झालेला आरोप-प्रत्यारोपाचा सिलसिला अद्याप बंद झालेला नाही. आता तर तो चक्क बॅनरपर्यंत पोहोचला आहे. अनिल देशमुख यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप केला होता.

तसंच, उद्धव आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या विरुद्ध प्रतिज्ञा पत्र भरून देण्यास सांगितले होते. फडणवीसांचा माणूस चार वेळा आपणास भेटायला आला होता. त्याने फोनवरून बोलणेही करून दिले होते, असा दावा देशमुख यांनी केला आहे. देशमुखांच्या या आरोपांवर फडणवीसांनी देशमुख गृहमंत्री असताना आघाडीच्या नेत्यांबाबत काय बोलले याचा पेनड्राईव्ह आपल्याकडे असून तो उघड करू असा इशारा दिला.

याला देशमुख यांनी सुध्दा तुमचा एक पेन ड्राईव्ह आपल्याकडे असल्याचे सांगत त्यांना प्रत्युत्तर दिलं, त्यानंतर 'पेनड्राईव्ह'चा वाद बंद झाला होता. मात्र, आता या दोघांमधील वाद विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत असाच सुरु राहण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT