Dayashankar  Tiwari venomous remarks on Indira Gandih and Neharu.
Dayashankar Tiwari venomous remarks on Indira Gandih and Neharu. Sarkarnama
विदर्भ

महापौरांची जीभ घसरली, नेहरू आणि इंदिरा गांधींवर केली जहरी टिका...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशच्या विभाजन करायचे ठरवले होते. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांचे कौतुक केले होते आणि बांगलादेशमध्ये पश्‍चिम बंगालचा समावेश करण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा त्यांनी वाजपेयींचा सल्ला ऐकला नाही. परिणामी आज पश्‍चिम बंगालमधून आतंकवादी भारतात शिरत आहेत, असे म्हणत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधींच्या धोरणावर त्यांनी जहरी टिका केली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने आयोजित ‘युवा छात्र संसद’च्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. महापौर म्हणाले, लोकशाहीत विरोधी पक्ष सशक्त असणे ज्याप्रमाणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे विरोधक सकारात्मक असणेही तेवढेच गरजेचे आहे. इंदिरा गांधी यांच्या पाकिस्तान-बांगलादेशच्या विभाजनाच्या निर्णयाला अटलबिहारी वाजपेयी यांनी समर्थन दिले होते. इंदिरा गांधी यांना रणचंडी उपाधी त्यांनी दिली होती. त्याचवेळी वाजपेयी यांनी बांगलादेशमध्ये पश्चिम बंगालचा समावेश करण्याचाही सल्ला दिला होता. मात्र इंदिरा गांधी यांनी तो मानला नाही. आज बांगलादेश आतंकवाद्यांचा मोठा अड्डा झाला आहे आणि भारताची डोकेदुखी वाढली आहे, असे तिवारी म्हणाले.

मंचावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, उद्योजक डॉ. समय बन्सोड, प्रकुलगुरू डॉ. संजय दुधे यांच्यासह विष्णू चांगदे, टारझन गायकवाड, कुलसचिव डॉ. राजू हिवसे उपस्थित होते. आभार विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. अभय मुद्गल यांनी मानले.

नेहरूंच्या उदार धोरणावर टीका

भारत-पाकिस्तान युद्ध आणि भारत-चीन युद्धानंतर आपण मोठ्या प्रमाणात जागा गमावली. यास तत्कालीन पंतप्रधान नेहरू हेच जबाबदार आहेत. सैनिकांनी आपल्या जिवाचे बलिदान देऊन जमीन देशाच्या ताब्यात घेतली होती. मात्र, नेहरू यांच्या अति उदारमतवादी धोरणामुळे ती शेजारच्या देशांनी बळकावली. आज त्यामुळेच सीमावाद सुरू असल्याचे दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.

...ही तर भाजपची संसद

नागपूर विद्यापीठाच्या छात्र संसदेत प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झालेले दयाशंकर तिवारी, समय बन्सोड, विष्णू चांगदे आणि टारझन गायकवाड अ. भा. विद्यार्थी परिषदेतूनच आलेले आहेत. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्रकुलगुरू संजय दुधे आणि विद्यार्थी कल्याण संचालक अभय मुग्दल भाजपप्रणित संघटना शिक्षण मंचचे आहेत. भाजपव्यतिरिक्त इतर कुठल्याच पक्षाच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले नव्हते. त्यामुळे छात्र संसद विद्यापीठाची होती की भाजपची असा सवाल उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात कुलगुरूंसह आयोजकांशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT