Navneet Rana Latest News in Marathi
Navneet Rana Latest News in Marathi sarkarnama
विदर्भ

hindu-muslim politics|नवनीत राणा तोंडघशी पडल्या; बेपत्ता तरुणी म्हणाली, माझी बदनामी थांबवा...

सरकारनामा ब्युरो

अमरावती: दोन दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी १९ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार करत पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. खासदार राणांनी तर फोन रेकॉर्डिंगवरून पोलीस उपायुक्तांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जाब विचारत पोलीस आरोपींवर कारवाई करत नसल्याचा आरोपही केला.

त्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेतल्यानंतर नवनीत राणाच तोंडांवर पडल्याचे दिसत आहे. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर अखेर ती मुलगी सातारा येथे आढळून आली. पहाटे ३ वाजता तिला अमरावतीत तिच्या गावी आणण्यात आलं. राजापेठ पोलिसांनी मुलीकडून जबाब नोंदवून घेत तिला आई-वडिलांकडे सुपूर्द केलं. पण यावेळी मुलीने तिच्यासोबत कोणकाही गैरप्रकार घडला नसल्याचं कबूल केलं. मी शिक्षणासाठी गेली होते. मला कोणीही जबरदस्तीने पळवून नेलं नव्हतं, माझी बदनामी थांबवा. खासदार नवनीत राणा यांनी आपल्याबद्दल खोटी माहिती दिल्याचा आरोपही यावेळी मुलीने केला. त्यामुळे मुलीच्या जबाबामुळे नवनीत राणा तोंडघशी पडल्या आहेत.

अमरावतीच्या पोलीस (police) आयुक्त आरती सिंग यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, "रागाच्या भरात आपण घर सोडल्याचा जबाब तरुणीने दिला आहे. जबाब नोंदवून झाल्यानंतर तरुणीला तिच्या कुटूंबियांच्या स्वाधीन केलं आहे. "ही मुलगी पुण्यात होती. मात्र आता ती पुण्यातून रेल्वेने साताऱ्याकडे जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. साताऱ्यात ती रेल्वेमधून उतरली तेव्हा सातारा पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. त्यावेळी ती एकटीच होती आणि सुखरुप होती, असंही आरती सिंग यांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण?

दोन दिवसांपूर्वी संबंधित तरुणीला पळवून आंतरधर्मीय विवाह करण्यास भाग पाडून तिला डांबून ठेवल्याचा आरोप खासदार राणा यांनी केला होता. काही हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांसह त्या थेट राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि मुलीला समोर आणण्याची मागणी केली होती.

मुलीला डांबून ठेवले असल्याची तक्रार घेऊन मुलीचे पालक माझ्याकडे आले. मात्र मी फोन केल्यावर पोलिसांनी माझा फोन रेकॉर्ड केला. तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला. या मुद्द्यावर खासदार राणा या अमरावती पोलिस ठाण्यात पोलिसांशी त्यांचा वाद घातला. पोलिस रात्रीपासून चौकशी करत आहेत, मात्र काहीच समोर येत नाही. मात्र मुलगी कुठे आहे याबाबतही उत्तरे दिली जात नसल्याचा आरोपही राणांनी केला होता. यावर आता पोलिसांकडून प्रतिक्रिया आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT