Yavatmal News Sarkarnama
विदर्भ

Yavatmal OBC Andolan : ओबीसी आक्रमक : आरक्षण बचाव महासमितीने केले घंटानाद आंदोलन

OBC News : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी महाराष्ट्रामध्ये जोर धरू लागली आहे.

सतीश हरिश्चंद्र येटरे

Yavatmal News : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये, या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी ओबीसी आरक्षण बचाव महासमितीने स्थानिक महात्मा जाेतिबा फुले पुतळ्याजवळ घंटानाद आंदोलन केले. या वेळी ओबीसी प्रवर्गातील सर्व जाती समूहाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मराठा समाजाला ओबीसी (OBC) प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला कुणबीमध्ये समाविष्ट करून त्यांचा ओबीसी आरक्षणात समावेश करण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप ओबीसी समाजातून होत आहे. परंतु संविधानाच्या कलम 15 (4) व कलम 16(4) नुसार या समाजाला अपवादात्मक परिस्थितीला कारणास्तवसुद्धा 50 टक्केच्या वरील आरक्षण देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या दि. 5 मे 2021 च्या निकालात स्पष्ट केलेले आहे.

त्यामुळे मराठा समाज (Maratha Reservation) हा सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास नसल्याचे सिद्ध झाले आहे. तरीही राज्य सरकारने आंदोलनाच्या दबावाखाली मराठा समाजाला कुणबी जातीचे दाखले दिल्यास व ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न केल्यास तो ओबीसीवर अन्याय होईल. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

या वेळी अॅड. राजेंद्र महाडोळे, विठ्ठलराव नागतोडे, लक्ष्मीकांत लोळगे, रमेश गिरोळकर, उत्तमराव खंदारे, प्रलय टिप्रमवार, कैलास गव्हाणकर, शैलेंद्र गुल्हाने, राहुल हरसुले, संजय मादेश्वार, अशोक तिखे, विजय निवल, चंद्रकांत दोनाडकर, डॉ. दिलीप धावडे, जिनेंद्र ब्राह्मणकर, संजय ईश्वरकर, जितेंद्र हिंगासपुरे, दिलीप साऊरकर, गणेश कुमकर, गोविंद चव्हाण, किशोर साखरकर, हिम्मतराव मोरे, अॅड. अरुण सागळे, उत्तम गुल्हाने, दीपक वाघ, अशोक मोहले, अरुण कपिले, संजय पारधी, प्रशांत झरकर, विवेक डेहणकर, आर. बी. चांदुरकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT