Nitn Raut, Vijay Wadettiwar and Others
Nitn Raut, Vijay Wadettiwar and Others Sarkarnama
विदर्भ

कॉंग्रेसची बलिदानाची परंपरा; आता दुप्पट वेगाने उभारी घेऊ...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : केंद्रातील भाजप सरकार ईडी आणि सीबीआयचा वापर कसा करीत आहे, हे देशाची जनता बघते आहे. आता त्यांनी अति केले आहे. अति तेथे माती’, ही म्हण कदाचित त्यांना माहिती नसावी. ते ईडीचा जितका जास्त दबाव वाढवतील, तितक्याच दुप्पट वेगाने आम्ही उभारी घेऊ, असे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) म्हणाले.

आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, काँग्रेस पक्ष आणि गांधी परिवाराचा बलिदानाचा इतिहास आहे. त्यामुळे तुम्ही ईडीच्या माध्यमातून जितका जास्त दबाब आणण्याचा प्रयत्न कराल तितके आम्ही अधिक उभारी घेऊ, असा त्यांनी मोदी सरकारला दिला. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते खासदार राहुल गांधी यांना ईडीने पाठविलेल्या नोटिशीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने नागपुरातील ईडी कार्यालयापुढे जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोशपूर्ण घोषणा देऊन ईडी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.

राहुल गांधी आगे बढो..हम तुम्हारे साथ है, नही चलेगी, नही चलेगी तानाशाही नही चलेगी, मोदी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालय परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून हा मोर्चा अडविला. मोर्चाचे नेतृत्व करणारे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत आणि आमदार विकास ठाकरे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची रवानगी केली.

या आंदोलनात मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, (Vijay Wadettiwar) माजी पालकमंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, राजेंद्र मुळक, नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, (Vikas Thakre) प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, आमदार अभिजित वंजारी, आमदार राजू पारवे, आमदार सहसराम कारोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, गिरीश पांडव, किशोर गजभिये तसेच विदर्भातील काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. राऊत म्हणाले, ईडी, सीबीआयचा धाक दाखवून तुम्ही आमदार, खासदारांना विकत घेऊ शकता, पण सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला विकत घेऊ शकत नाही. काँग्रेस कार्यकर्ता वरून शांत दिसत असला तरी तो तसा नाही. हा कार्यकर्ता पेटून उठला तर दडपशाही करणाऱ्या मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आमच्या नेत्यांवर ईडीच्या कितीही नोटिसा बजावा, आम्ही अजिबात घाबरणार नाही. रस्त्यावर उतरून प्रसंगी पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाऊन, रक्त सांडून या दडपशाहीचा विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी कृष्णकुमार पांडे, रत्नाकर जयपुरकर, अनिल नगरारे, नरेंद्र जिचकार, संजय दुबे, रवींद्र दरेकर, कमलेश समर्थ, सुरेश जग्याशी, सुरेश पाटील, दीपक खोब्रागडे, मुलचंद मेहर उपस्थित होते.

Chandrapur's congress Ladies workers

चंद्रपूरच्या महिला कार्यकर्त्यां पोलिसांच्या ताब्यात..

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या सूचनेनुसार, आजच्या आंदोलनात चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृवात चंद्रपूर जिल्ह्यातून शंभरपेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला. यावेळी नम्रता आचार्य ठेमस्कर आणि इतर महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली व पोलीस मुख्यालयात नेले. उपाध्यक्षा सुनीता धोटे, सेवादल महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा लता बारापात्रे, राजुरा शहर जिल्हाध्यक्षा संध्या चांदेकर, बल्लारपूर शहर अध्यक्षा मेघा भाले, तालुका अध्यक्षा अफसाना सययद, सिंदेवाही तालुका अध्यक्षा सीमा सहारे, गोंडपीपरी तालुका अध्यक्षा रेखा रामटेके, सावली नगराध्यक्षा लता लाकडे, सावली तालुका अध्यक्षा उषा भोयर, ब्रह्मपुरी तालुका अध्यक्षा मंगला लोनबले, शहर अध्यक्ष योगिता आमले, ममता डुकरे, जिवती तालुका अध्यक्षा नंदा मुसने, मेहेक सय्यद, पुष्पा नक्षणे, सरस्वती कोवे, माधुरी ठाकरे, सरिता गौरकर, निधी चौधरी सहभागी झाल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT