Ladies danst at shrirampur Grampanchayat, Pusad
Ladies danst at shrirampur Grampanchayat, Pusad Sarkarnama
विदर्भ

कचऱ्याच्या गाडीत वाजले गाणे, अन् श्रीरामपूरच्या महिलांनी धरला ठेका...

सरकारनामा ब्यूरो

पुसद (जि. यवतमाळ) : सरकारी काम, अन् चार महिने थांब, हे अंगवळणी पडलेल्या जनतेला त्यांनी केलेली मागणी वेळेपूर्वी पूर्ण झाली की कोण अत्यानंद होतो, याची प्रचिती नुकतीच शहरानजीकच्या श्रीरामपूर येथे आली. कचरा वाहून नेण्यास त्रास होत असल्याने कचरा गाडीची मागणी महिलांनी केली होती, ती लगेच पूर्ण झाली. अन् महिलांनी ‘गाडीवाला आया है, तू कचरा निकाल’, या गाण्यावर चक्क कचरा गाडीसमोरच ठेका धरला.

मुळातच स्वच्छतेची आवड असणाऱ्या गृहिणींना घर व परिसरातील कचरा वाहून नेण्यासाठी ग्रामपंचायत (Grampanchayat) प्रशासनाने घंटागाडी देताच श्रीरामपूर (Shrirampur) येथील बावने लेआउटमधील महिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या पुसद (Pusad) तालुक्यातील शहराला लागून असलेली श्रीरामपूर ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. यात नोकरदार वर्गाचा मोठा भरणा आहे. या ग्रामपंचायतीमध्ये महिलांना घरातील कचरा सार्वजनिक ठिकाणी ठेवलेल्या कचराकुंडीत नेऊन टाकायला फार त्रास सहन करावा लागत होता.

कचरा वाहून नेण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी दीड महिन्यापूर्वी बावणे लेआऊटमधील महिलांनी ग्रामपंचायत मध्ये जाऊन कचरा गाडीची मागणी केली. या मागण्यांची त्वरित दखल सरपंच आशिष काळबांडे आणि सदस्य विजय राठोड, मधुकर कलींदर यांनी घेतली व दोन महिन्यांच्या आत घंटागाडीची व्यवस्था करण्याचे अभिवचन दिले. त्याची पूर्तता दीड महिन्यातच केल्याने महिला आनंदित झाल्या.

बऱ्याच वर्षापासून प्रलंबित मागणी पूर्ण झाली. या महिलांनी घंटागाडीचे पूजन करून गाडीसमोर ‘गाडी वाला आया है, तू कचरा निकाल’ या गाण्यावर ठेका धरला व आपला आनंद व्यक्त केला. मागणीची दखल घेऊन पूर्तता केल्यामुळे सरपंच आशिष काळबांडे, उपसरपंच संगीता पांगारकर, ग्रामपंचायत सदस्य विजय राठोड, दिनेश चव्हाण, राहुल सहांरे, जलील बागवान, विशाल पवार आणि सचिव मुडे यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. घंटागाडी मिळावी म्हणून माजी पंचायत समिती सदस्य आशा संजय चव्हाण यांनी पुढाकार घेऊन महिलांना एकत्र करून सतत पाठपुरावा केला होता.

याप्रसंगी शीला सुरजुसे, सारिका कोठाळे योगिता पवार, कांता पुरोहित, हर्षलता राठोड, वनिता जाधव, रंजना राठोड, प्रमिला चवरे, रेणुका राठोड, साधना पुरोहित, प्रीती साबळे, पुनम पुरोहित, सुप्रिया पवार, बेबी चक्करवार, परेस पांगरकर, रामराव जाधव, माणिक सुरजुसे, बी. आर. राठोड, प्रा. संजय चव्हाण, प्रा. दिनेश राठोड, प्रा. धनंजय कोठाळे, मुकुंदराव चवरे, अवी साबळे, एस. डी. जाधव, हरिदास धोंगडे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT