Winter Session Sarkarnama
विदर्भ

Assembly Winter Session: शरमेची गोष्ट आहे.. म्हणत महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वेळीच रोखले...

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Assembly Winter Session : महाराष्ट्रात सातत्याने महापुरूषांचा आणि संतांचा अपमान केला जात आहे. येवढे होऊनही सरकार (State Government) अशा लोकांवर कारवाई करत नाही आणि साधी तंबीदेखील दिली जात नाही. हा प्रकार सहन न झाल्याने एका महिलेने अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

सुरक्षारक्षकांच्या वेळीच हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी वेळीच महिलेला आवरले. त्यामुळे पुढील सर्व प्रकार टळला. महिलेचे नाव कविता चव्हाण असल्याचे सांगितले गेले आहे. तुम्ही शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) नावावर राजकारण करता, वारकरी संप्रदायाचा अपमान करता, तुमच्या अधिवेशनात पोलिसांना (Police) जेवण मिळत नाही, तुमच्याकडे कुठलेच मुद्दे शिल्लक नाहीत, शिवाजी महाराज की जय. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) की जय,अशा घोषणा देत या महिलेने अचानक विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अंगावर डिझेल ओतून घेतलं.

तिथल्या सुरक्षारक्षकांनी तिला वेळीच थांबवले आणि पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले असून तिला नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. महिला सोलापूर येथील असून तिचे नाव कविता चव्हाण असल्याची माहिती आहे. राज्यभरात महापुरुषांचे अपमान करण्याची स्पर्धाच सुरु असून यावर राज्य सरकार बोलायला तयार नसल्याचे आरोप करत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. तसेच दररोज राज्यपाल हटाओ, महाराष्ट्र बचाओ,

या आंदोलनकर्त्या महिलेच्या समर्थकांनी दिलेल्या निवेदनानुसार, आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात महापुरुषांना बदनाम करणे, त्यांच्याबद्दल खालच्या पातळीचे वक्तव्य करणे हे नित्याचे झाले आहे. अशा प्रकाराने सामान्य जनमानसाची मने दुखावली जातं आहेत. आजकाल ज्यांची लायकी नाही, अशी लोकही त्यांच्या मनाला वाटेल त्या हिन पातळीचे वक्तव्य करु महापुरुषांबद्दल अपशब्द बोलत आहेत. याचा आम्ही निषेध करतो. असे बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांच्या विरोधात कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निवेदनात म्हटले आहे.

महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कायदे करणे आवश्यक आहे. जेणेकरून कोणीही अशा प्रकाराचे कृत्य करणार नाही. त्यामुळे जनसामान्यांच्या मनातील खदखद ओळखुन योग्य ती उपाययोजना करण्यात यावी. या अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिस बांधवांना दोन दिवस जेवणं उपलब्ध झाले नाही. ही अत्यंत दुःखद बाब आहे. जर रक्षणकर्त्यांच्या पोटाचा प्रश्न उपस्थित होत असेल तर यापेक्षा शरमेची दुसरी गोष्ट असु शकत नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT