गोंडपिपरी (जि. नागपूर) : रावण आमचा देव आहे. त्यांना जाळायचे असेल तर आधी आम्हाला जाळा, अशी आक्रमक भूमिका गोंडपिंपरीत आदिवासी युवती व महिलांनी घेतली. यानंतर काही काळासाठी वातावरण तापलं. यानंतर रावण दहनाचा कार्यक्रम थांबविण्यात आला. दरम्यान ठाणेदार (Police Inspector) जीवन राजगुरू यांनी प्रभावी समन्वय साधत शांततेचा मार्ग काढला.
दस-याच्या निमित्तानं आज चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्याच्या गोंडपिपरी येथील गजानन कॉलेजच्या मैदानावर रावण दहनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. गोंडपिपरी येथील नागरिकांनी यासाठी जय्यत तयारी केली होती. गजानन कॉलेजच्या पटांगणावर रावणाची प्रतिकृती तयार करण्यात आली. गावातून रॅली काढीत लोक रावण दहनासाठी निघाले.
दरम्यान रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्याची माहिती आदिवासी बांधवांना मिळाली. भाजपच्या नगरसेविका तथा युवा कार्यकर्त्यां मनीषा मडावी, डॉ. सफल कोटनाके, निर्मला मडावी, उषा आलाम, सुरेखा मडावी, विजया मडावी यांच्यासह आदिवासी समाजातील तरुण मंडळी गजानन कॉलेज परिसरात दाखल झाली.
रावण आमचा देव आहे.आमच्या देवाला जाळण्याआधी आम्हाला जाळा, अशी भूमिका घेत रावण दहनाला विरोध केला. यावेळी काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान घटनेची माहिती कळताच ठाणेदार जीवन राजगुरू घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात त्यांनी प्रभावी समन्वय साधून प्रकरण शांत केले. गोंडपिंपरीत आदिवासी बांधव मोठ्या संख्येने आहेत. येथील आदिवासी चौकात ते रावणाची पूजा करतात. एकीकडे आपल्या देवाची पूजा होत असताना दुसरीकडे रावण दहन होत असल्याने महिला संतापल्या.
गोंडपिपरी शांतताप्रिय गाव म्हणून ओळखले जाते. आज गोंडपिपरीवासीयांनी या प्रकरणी शांतता दाखवून ते सिद्ध केलं. रावण आमचा देव आहे. आम्ही आमच्या देवाला जाळताना चूप राहू शकत नाही. आमच्या पूर्वजांनी हे सहन केलं असेल, पण यापुढे ही कुप्रथा बंद व्हायला हवी.
- मनीषा मडावी, नगरसेविका तथा आदिवासी कार्यकर्ता, गोंडपिपरी.
ठाणेदारांनी समन्वयातून काढला तोडगा..
रावण दहनावरून आज गोंडपिंपरीत वातावरण काही काळासाठी तापले. पण ठाणेदार राजगुरू घटनास्थळी दाखल होताच त्यांनी परिस्थिती हाताळीत समन्वयाने तोडगा काढला. अन् शेवटी रावनदहनाचा कार्यक्रम रदद करावा लागला. दरम्यान या प्रकारानंतर आदिवासी बांधवांनी आदिवासी चौकात रावणाच्या पूजेचा कार्यक्रम साजरा केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.