MLA Ravi Rana
MLA Ravi Rana Sarkarnama
विदर्भ

MLA Ravi Rana : निराश होण्याचं कारण नाही मला लवकरच मंत्री पद मिळेल !

सरकारनामा ब्यूरो

अमर घटारे

अमरावती : आज मला येथे राखी बांधायला आलेल्या माझ्या सर्व बहिणींना अपेक्षा होती की, मला मंत्रिपद मिळेल. ते साहजिकच आहे. कोणत्याही आईला, बहिणीला ते वाटणारच आहे. कारण माझ्या आई, बहिणी शेकडो किलोमीटर पायी फिरून प्रचार करतात, अहोरात्र मेहनत करतात, देव पाण्यात बुडवून विजयाची प्रार्थना करतात, उपवास करतात आणि मी मंत्री झालो पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी केली तर ती योग्यच आहे. आज सर्वांनी मला ती बोलून दाखवली, असे बडनेऱ्याचे आमदार रवी राणा म्हणाले.

मी त्यांना विश्‍वासाने सांगितले आहे की, निराश होण्याचे कारण नाही. कारण मला लवकरच मंत्रिपद मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासारखे सक्षम नेतृत्व आपल्या राज्याला लाभले आहे. त्यांच्यासोबत पूर्ण ताकदीनिशी उभे असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आहेत. सध्या अर्धेच मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेलं आहे आणि अर्ध्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणे अद्याप बाकी आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्याकडे फडणवीसांचं पूर्ण लक्ष आहे. काल, आज नाही तर गेल्या १० वर्षांपासून मी त्यांच्या सोबत आहे, असे आमदार राणा (MLA Ravi Rana) म्हणाले.

आपल्या खासदार नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन दिलेलं आहे. लोकांचा नेता, लोकांमध्ये मिसळणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांची ओळख आहे. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडून असलेला कार्यकर्ता मंत्री बनेल आणि या जिल्ह्याचा पालकमंत्रीसुद्धा बनेल, अशी आमची अपेक्षा आहे. जमिनीवर पाय असलेला कार्यकर्ता या जिल्ह्याचा पालकमंत्री बनेल, असा विश्‍वास आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला.

मी आजपर्यंत कधीही मंत्रिपदाची मागणी केलेली नाही. सातत्याने आपले काम करीत राहिलो. जनतेच्या मनात स्थान निर्माण केले. उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात ऑनलाइन सरकार महाराष्ट्रात होतं. ते नष्ट करायचं होतं आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारे नेतृत्व या महाराष्ट्राला द्यायचे होते. महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात पोहोचणारे नेतृत्व या राज्याला द्यायचे होते. ते महत्वाचे काम आम्ही केलेले आहे. त्यामुळे मी स्वतः कधीच मंत्रिपद मागितले नाही. पण या जिल्ह्याला लवकरच मंत्री मिळेल, असेही आमदार राणा म्हणाले.

दरवर्षी प्रमाणे यंदाही युवा स्वाभिमान पार्टी द्वारा अमरावतीत भव्य रक्षा बंधन कार्यक्रम आज आमदार रवी राणा यांच्या अमरावती येथील मुख्य कार्यालयावर हजारो महिलांनी राखी बांधून साजरा केला, यावेळी आमदार राणा यांना जिल्ह्यातील शेकडो महिलांनी राख्या बांधल्या. हजारो महिलांना तिरंगा झेंड्यांचे वाटपही करण्यात यावेळी आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT