Atul Londhe, MPSC Sarkarnama
विदर्भ

Atul Londhe On MPSC : हा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, कुणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये...

Congress : काँग्रेस पक्ष या निर्णयाचे स्वागत करणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

MPSC : एमपीएससीची तयारी करणा-या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय सरकार लवकरच घेणार असल्याची माहिती आहे. पण याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले.

असे झाल्यास काँग्रेस (Congress) पक्ष या निर्णयाचे स्वागतच करणार, यात शंका नाही. पण हा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय असे सांगत अतुल लोंढे (Atul Londhe) म्हणाले की, नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२५ या वर्षापासून करावी, अशी राज्यभरातील (Maharashtra) लाखो विद्यार्थ्यांची मागणी आहे. गेल्या काही महिन्यांत विद्यार्थ्यांनी या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलनेही केली होती. काँग्रेस पक्षाने विद्यार्थ्यांच्या या मागणीला सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patoe) यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा लावून धरत यासंदर्भात सरकारला विनंती केली होती. पण सरकारने आडमुठेपणाची भूमिका घेत निर्णय घेण्याचे तेव्हा टाळले होते. त्यानंतर १३ जानेवारी रोजी काँग्रेस पक्षातर्फे पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांसह संपूर्ण राज्यभरात एकाच दिवशी आंदोलन करण्यात आले होते. पुण्याच्या अलका टॉकिज चौकात हजारो विद्यार्थ्यांसह सकाळी १० वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत मी स्वतः आंदोलन केले होते, असे लोंढे यांनी सांगितले

त्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही पुणे शहरात होते. पण त्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची साधी भेटही घेतली नव्हती. त्यानंतरही राज्यभरात विद्यार्थी आक्रमक झाले होते आणि आंदोलन करत होते. मी स्वतः पाठपुरावा करून विधानपरिषद उपसभापती निलम गो-हे यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा केला होता. त्यांनी राज्य सरकार आणि एमपीएससीच्या अधिका-यांसोबत बैठका घेतल्या होत्या. विद्यार्थ्यांची मागणीही न्याय्य होती. त्यामुळे आता सरकारपुढे यासंदर्भात निर्णय घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

विद्यार्थ्यांच्या एकजुटीपुढे सरकारला झुकावे लागणार आहे. असे झाल्यास कुणी या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी प्रय असा टोला अतुल लोंढे यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT