Amravati Political News : कॉंग्रेसची जनसंवाद यात्रा अमरावतीमध्ये १० दिवस चालणार आहे. यासाठी राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज (ता. २६) अमरावतीमध्ये आहेत. कालच (ता. २५) भाजपचे ‘घर चलो अभियान’ अमरावतीमध्ये राबविण्यात आले. त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीत होते. त्यावरून वडेट्टीवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे. (BJP state president Chandrashekhar Bawankule was in Amravati)
पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, भाजपचे ते घर चलो अभियान नाही, तर ‘घरघर’ आहे. त्यांना अखेरची घरघर लागलेली आहे. अंतिम समयी जी घरघर लागते, ती काल जेवढे लोक त्यांच्यासोबत होते, त्यावरून लक्षात आली आहे. ज्यावेळी चांद्रयान तीनचे ‘सॉफ्ट लॅंडीग’ झाले. त्यावेळी किती लोक ‘लाईव्ह’ बघत होते. आणि देशाचे ‘मसीहा’ येताच किती लोक ‘आऊट’ झाले, हे देशाने पाहिले आहे.
आज पश्चिम विदर्भातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक आहे. अमरावती विभागात जनसंवाद यात्रा निघणार आहे. १० दिवस ही यात्रा चालणार आहे. हुकूमशाहीच जे त्रिकूट सरकार केंद्रात सध्या आहे, हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. महागाई आणि बेरोजगारीच्या झळा लोकांना बसल्या आहेत, त्याच्या तीव्रतेने लोक ग्रासले आहेत. त्यामुळे आम्ही लोकांमध्ये जाऊन जागृती करण्याचे काम करत आहोत, असे वडेट्टीवार म्हणाले.
महात्मा गांधींविरुद्ध बोलणारे जे लोक आहेत. त्यामुळे महात्मा गांधींचं योगदान जनतेसमोर न्यायचं आहे. जे ट्रिपल इंजिनचं सरकार लोकांच्या बोकांडी बसलेलं आहे, ते या राज्यातून हाकलणं, हा आमचा उद्देश आहे. बाजार मांडणाऱ्यांसाठी बाजारपेठ महत्वाची आहे आणि आमच्यासारख्या जनतेची सेवा करणाऱ्यांना जनता महत्वाची आहे.
ज्या लोकांनी बाजार मांडला आहे ते बाजारातच फिरणारच आहेत. यावर आता बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) उत्तर देतील, असे ते म्हणाले. त्यांनी बाजारात फिरावे, बाजार मांडावा नाहीतर बाजार वसुलावा, हा त्यांचा प्रश्न आहे, असे म्हणत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाजप (BJP) नेत्यांवर तोफ डागली.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.