Sudhir Mungantiwar Sarkarnama
विदर्भ

राजद्रोहाचा गुन्हा लावणाऱ्या त्या पोलिसांना सेवेतून तडीपार व्हावे लागेल…

एक नवीन पिढी निरक्षराची साक्षर झाली, असं काही तरी म्हणावं लागेल, असा टोला राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : हनुमान चालिसा म्हटल्यानंतर राजद्रोहाचं कलम लावणं चुकीचं आहे. हा शिक्षणाचा अभाव आहे किंवा एक नवीन पिढी निरक्षराची साक्षर झाली, असं काही तरी म्हणावं लागेल, असा टोला राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

याबाबत बोलताना आमदार मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) म्हणाले, जर कुणी भारत (India) माता की जय किंवा वंदे मातरमला विरोध करीत असेल किंवा इतर देशांशी संपर्क करून आपल्या देशाचे वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर अशा प्रसंगांमध्ये त्या व्यक्तीवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हणणे हा काही राजद्राहोचा गुन्हा दाखल करण्यासारखा अपराध असू शकत नाही. सरकारने हे जे काही केले आहे, ते चांगले नाही. याचे दूरगामी परिणाम संबंधितांना भोगावे लागतील.

हनुमान चालिसा म्हणणे हा काही राजद्रोहाचा गुन्हा असू शकत नाही. राजद्रोहाचा गुन्हा केव्हा लागतो, हे पोलिसांना ठाऊक असायला हवे. पण राजा काहीही करू शकतो, तसेच सरकारही सर्वकाही करू शकते, असेच म्हणावे लागेल. मात्र हा प्रकार काही बरोबर नाही. पोलिसांनी लावलेला गुन्हा न्यायालयाने काढून टाकला. ज्या पोलिसांनी हे केले, त्यांची जेव्हा केव्हा चौकशी होईल, तेव्हा या पोलिसांना सेवेतून तडीपार व्हावे लागेल, एवढे मात्र नक्की, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राणा दाम्पत्याच्या संदर्भात दिली.

ज्या पोलिस अधिकाऱ्यांना राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचे गुन्हे दाखल केले, असे अधिकारी सेवेत राहूच शकत नाहीत. पण या सरकारमध्ये काहीही होऊ शकते. कोणत्या प्रकरणात कोणते गुन्हे दाखल केले पाहिजे, हे जर पोलिस अधिकाऱ्यांना कळत नसेल, तर भविष्यात त्यांच्यासमोर मोठ्या अडचणी उभ्या ठाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे गेल्या २७ वर्षांच्या विधानसभा सदस्य असल्याच्या अनुभवावरून मी निश्‍चितपणे सांगू शकतो, असेही आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT