Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis Threat: देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी...

सरकारनामा ब्युरो

Nagpur News: नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घराबाहेर बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आला होता. या प्रकऱणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रात्री दोन वाजता पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रुमला मध्यरात्री दोन वाजता एका व्यक्तीने फोन केला. त्याने देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेब बॉम्ब ठेवल्याचे सांगत धमकी दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने फडणवीसांच्या घरी घेत बॉम्ब शोधक पथक आणि पोलीस सुरक्षा वाढवली. तसेच फोन करणाऱ्यालाही अटक केली.

- फोन करणारा व्यक्ती हा नागपूरच्या कन्हान भागातील राहणारा असून घरची वीज गेली म्हणून रागाच्या भरात बॉम्ब ठेवल्याचा फोन केला. अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT