Navnit Rana Sarkarnama
विदर्भ

Threat to Navneet Rana: ‘गर्दीत कधीही चाकूने वार करीन’, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी !

Tiosa - Amravati Political News: विठ्ठलराव नामक व्यक्तीने अश्‍लील शिवीगाळदेखील केल्‍याचे तक्रारीत नमूद आहे.

सरकारनामा ब्यूरो

Amravati MP Navneet Rana: खासदार नवनीत राणा यांच्‍याबाबत एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नवनीत राणा यांना जीवे मारण्‍याची धमकी देण्‍यात आली आहे. गेल्‍या पाच ते सहा दिवसांपासून नवनीत राणा यांच्‍या मोबाईलवर विठ्ठलराव नावाची व्‍यक्‍ती चाकूने वार करून ठार करू, अशी धमकी देत आहे. (Private Secretary Vinod Guhe filed a complaint)

यासंदर्भात खासदार राणा यांचे खासगी सचिव विनोद गुहे यांनी अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्‍यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. १६ ऑगस्‍टपासून विठ्ठलराव नावाची व्‍यक्‍ती नवनीत राणा यांच्‍या मोबाईलवर संपर्क साधून गर्दीच्‍या ठिकाणी मी कधीही धारदार चाकूने वार करणार, ते माहितीही पडणार नाही, अशा शब्‍दांमध्‍ये धमकी देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

धमकी देणाऱ्या विठ्ठलराव नामक व्यक्तीने अश्‍लील शिवीगाळदेखील केल्‍याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी आरोपीच्‍या विरोधात भादंवि ५०४, ५०६ (ब) कलमान्‍वये गुन्‍हा दाखल केला आहे.

गेल्‍या वर्षीदेखील हनुमान चालिसा पठण केल्‍यास तुम्‍हाला ठार मारू, अशी धमकी नवनीत राणा यांना देण्‍यात आली होती. या प्रकरणी खासदार नवनीत राणांनी नवी दिल्‍ली येथील नॉर्थ एव्‍हेन्‍यू पोलीस ठाण्‍यात तक्रार दाखल केली होती. आता धमकीचा नवीन प्रकार समोर आला आहे.

088055 41949 या मोबाईल नंबरवरून धमकी देण्यात आली आहे. विठ्ठलराव नामक हा व्यक्ती तिवसा येथून बोलत असल्याचे सांगतो. अशा माथेफिरू भामट्याला त्वरित जेरबंद करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्या व्यक्तीचा ताबडतोब शोध घेऊन अटक करावी, अशी मागणी खासदार राणांच्या खासगी सचिवाने राजापेठ पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.

हनुमान चालिसा पठणाने खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) चांगलेच चर्चेत आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करण्याच्या प्रयत्नात दोघांनाही अटक करण्यात आली होती. त्यानंतरही त्यांनी हा कार्यक्रम सुरूच ठेवला होता. तेव्हाही खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT