Akola Police on Railway Station Sarkarnama
विदर्भ

भाजप खासदाराचे घर आणि अकोला-पूर्णा रेल्वे बॉम्बने उडवण्याची धमकी !

अकोला (Akola) पोलिसांनी ही माहिती मिळताच त्यांनी खासदार धोत्रे यांच्या घरी बंदोबस्त वाढवला. काल रात्री पोलिसांना या संदर्भात कॉल आला होता.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर ः भाजपचे (BJP) अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचे घर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईच्या (Mumbai) पोलिस नियंत्रण कक्षाने अकोला पोलिसांना ही माहिती दिली. धमकी देणाऱ्याने अकोला-पूर्णा ही रेल्वे सुद्धा बॉम्बने उडवण्याची धमकी दिलेली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

अकोला (Akola) पोलिसांनी (Police) ही माहिती मिळताच त्यांनी खासदार धोत्रे (MP Sanjay Dhotre) यांच्या घरी बंदोबस्त वाढवला. काल रात्री पोलिसांना या संदर्भात कॉल आला होता. त्यानंतर लगेच बॉम्बशोधक पथक पाठवून खासदारांच्या घराची पूर्ण तपासणी करण्यात आली. आज सकाळी जिल्हा पोलिस अधीक्षकांना (DSP) आपल्या चमूसोबत येऊन पाहणी केली. सोबत अकोला-पूर्णा रेल्वेचीही तपासणी करण्यात आली. या रेल्वेमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली होती.

खासदारांचे घर आणि रेल्वे दोहोंचीही तपासणी केल्यानंतर कुठेही बॉम्ब आढळला नाही. त्यामुळे धमकीचा कॉल कुणी केला होता, याचा तपास आता केला जात आहे. रेल्वे स्टेशनवर आलेल्या गाडीची संपूर्ण तपासणी केली. तपासणी केल्यानंतर काहीच सापडले नसल्याने गाडी पुढील प्रवासासाठी रवाना केली. धोत्रे यांच्या घराबाहेर पोलिस तैनात केल्यानंतर अखेर ती अफवा ठरली. फेक फोन कॉल करणाऱ्यांचा पोलिस कसून शोध घेत आहेत.

शहरातील नागरिकांनी अशा अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. लोकांनी शांतता बाळगावी आणि कुठेही संशयास्पद वस्तू आढळल्यास किंवा संशयास्पद हालचाली दिसल्यात तात्काळ पोलिसांनी कळवावे, असेही सांगण्यात आले आहे. खासदार संजय धोत्रे आणि अकोला-पूर्णा एक्सप्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती खोटी निघाल्यानंतरही पोलिसांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT