BRS Morcha at Tumsar 
विदर्भ

Tumsar BRS News : चरण वाघमारेंचे ‘केसीआर’च्या पावलावर पाऊल, गुलाबी वादळ घेऊन धडकले एसडीओ ऑफिसवर !

KCR's BRS : चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली आहे.

अभिजीत घोरमारे

Bhandara District's BRS Political News : तेलंगणा विकास मॉडेल राज्यात तत्काळ लागू करा, नाही तर खुर्ची खाली करा, अशी गर्जना माजी आमदार व भारत राष्ट्र समितीचे विदर्भाचे समन्वयक माजी आमदार चरण वाघमारे यांनी केली आहे. यासाठी आपले गुलाबी वादळ घेऊन ते तुमसर उपविभागीय कार्यालयावर धडकले. (Chandrasekhar Rao's Bharat Rashtra Samiti has received national party recognition)

भंडारा जिल्ह्यात भारत राष्ट्र समितीचे प्रस्थ वाढत चालले आहे. हे पाहता चरण वाघमारे ‘केसीआर’ (के. चंद्रशेखर राव) बनू पाहताय का, असा प्रश्न राजकीय जाणकारांना पडला आहे. शेतकऱ्यांना तेलंगणा राज्याप्रमाणे प्रतिएकर १० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी.

शेतकऱ्यांना बाराही महिने चोवीस तास उच्च दाबाची मोफत वीज, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ, शेतकऱ्यांच्या पाच लाख रुपयांचा विमा, तेलंगणा राज्याप्रमाणे दलित बंधू योजना सुरू करून रोजगारांसाठी दहा लाख रुपये बिना परतावा देण्यात यावा आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली आहे. लागलीच त्यांनी देशातील विविध राज्यांत आपल्या पक्षाचे नेटवर्क वाढवण्यास सुरुवात केली. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसविरहीत आघाडीसाठी प्रयत्नही चंद्रशेखर राव यांनी सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी नांदेडमध्ये पाच फेब्रुवारीला जाहीर सभा घेतली होती.

नांदेडमधून राव यांनी 'अब की बार किसान सरकार'चा नारा दिला. त्या सभेला मिळालेला उत्तम प्रतिसाद लक्षात घेता भाजप काँग्रेसला बीआरएस पर्याय मानला जात आहे. त्यामुळे चंद्रशेखर राव यांनी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राव यांनी आपला मोर्चा महाराष्ट्रातही वळविला असून, पक्ष वाढवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

माजी आमदार चरण वाघमारे यांचे पूर्व विदर्भातील प्रस्थ लक्षात घेता पूर्व विदर्भाचे संघटनप्रमुख त्यांना करण्यात आले. बीआरएसचे मूळ हे शेतकरी हित आहे. वाघमारेसुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकत्र करत त्यांना तेलंगणा मॉडेल पटवून सांगत फिरत आहेत. कालचे (ता. १६) तुमसरातील शेतकऱ्यांचे आंदोलन बघता शेतकऱ्यांना हे मॉडेल पटले, असे वाटत आहे. त्यामुळे तेलंगणाच्या धरतीवर चरण वाघमारे ‘केसीआर’च्या पावलावर पाऊल टाकत असल्याचे दिसत आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT