Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Tumsar Crime News : नईमच्या खुनासाठी भंडारा पोलिसच जबाबदार, वाळू तस्करीतही पोलिसांचा समावेश !

Murder in Tumsar Due To Sand Smuggling : खळबळजनक आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

अभिजीत घोरमारे

Bhandara District Tumsar Crime News : सराईत गुन्हेगार ‘मोक्का’तील आरोपी नईम शेखच्या मृत्यूला भंडारा पोलिसच जबाबदार आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या वाळू तस्करीत भंडारा पोलिस सहभागी आहेत आणि या तस्करीच्या वर्चस्वावरून जिल्ह्यात गॅंगवॉर वाढले असल्याचा खळबळजनक आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. (The sensational allegation was made by the Nana Patole)

वाळू तस्करीतील वर्चस्वावरून नईम शेखचा काल (ता. २५) तुमसर येथील गोबरवाही रेल्वे फाटकाजवळ गोळी झाडून खून करण्यात आला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर नाना पटोले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, भंडारा पोलिसांच्या भूमिकेवर परखड मत व्यक्त करताना नाना पटोले यांनी भंडारा पोलिसांना पुन्हा टार्गेट केले आहे. आज (ता. २५) नागपुरात नईम शेखच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होणार आहे. उशिरा रात्री नईम शेखचा मृतदेह तुमसरमध्ये आणला जाणार आहे. तुमसर तहसील कार्यालयाच्या मागे असलेल्या कब्रस्तानमध्ये नईमला मूठमाती देण्यात येणार आहे.

भंडारा जिल्ह्यात मागील आठवड्यात आलेल्या पुरामुळे उद्भवलेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी नाना पटोले आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात आधी भंडारा पोलिसांचीच चौकशी केली पाहिजे. त्यामुळे भंडारा पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

दुसरीकडे पोलिस विभागातील रिक्त पदांकडेही नानांनी सरकारचे लक्ष वेधले. भंडारा जिल्ह्यात पोलिस विभागात रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. जे तोकडे पोलिस बल उपलब्ध आहे, ते ४० खोकेवाल्याचे संरक्षण करीत आहे. कारण नसताना इतकी सुरक्षा पुरवली गेल्याने पोलिसांवर ताण वाढला असल्याचे सांगत पोलिसांची पाठराखण करण्याचाही नानांनी प्रयत्न केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा पोलिसांवर केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. वाळू तस्करीत पोलिसांच्या सहभाग खूप काही सांगून जात आहे. आता या प्रकरणाची स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असून, चौकशीची मागणी करणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

या प्रकरणात आता नईम शेखच्या खुनाने भंडारा पोलिसांचे टेन्शन वाढवले आहे. एकीकडे वाढता राजकीय दबाव, तर दुसरीकडे जिल्ह्यात पुन्हा गॅंगवॉर उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलिसांवर दुहेरी टेन्शन आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT