Ravikant Tupkar Sarkarnama
विदर्भ

Tupkar : हरभरा खरेदीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ, रविकांत तुपकरांनी रेटली होती मागणी !

Buldhana : प्रधान सचिव अनुपकुमार यांच्याशी तुपकर यांनी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली.

सरकारनामा ब्यूरो

Various problems of farmers were brought to mind : नाफेडमार्फत हरभरा खरेदीसाठी नोंदणीची मुदत १५ मार्चला संपुष्टात येणार होती. त्यामुळे असंख्य शेतकरी नोंदणीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हा पातळीपासून राज्यस्तरावर मुदतवाढीची मागणी रेटून धरली.

जिल्हाधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड यांच्यासह नाफेडचे बीएम पुनीतसिंग तसेच सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांच्याशी तुपकर यांनी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली. तसेच बुलढाणा जिल्हाधिकारी तुम्मोड यांनीही पुनीतसिंग व अनुप कुमार यांच्याकडे पाठपुरावा केला. शेतकऱ्यांच्या विविध अडचणी लक्षात आणून दिल्या. ६ मार्चपासून ते आजपर्यंत वारंवार केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले.

शासनाने अखेर हरभरा खरेदीच्या नोंदणीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली असून, तसा शासन निर्णयदेखील जारी केला आहे. नाफेडच्या माध्यमातून हरभरा खरेदीच्या नोंदणीस १५ मार्चपर्यंतच मुदत देण्यात आली होती. हा अवधी कमी पडत असल्याने हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागणार होते. अखेर शेतकऱ्यांनी ही बाब शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या कानावर घातली.

तुपकर यांनी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचे प्रतिनिधी व शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी (Collector) डॉ. एच.पी. तुम्मोड यांची ६ मार्च रोजी भेट घेऊन मुदतवाढीची मागणी केली होती. नाफेडचे बी.एम. पुनीतसिंग आणि सहकार व पणनचे प्रधान सचिव अनुपकुमार यांच्यासमवेत भ्रमणध्वनीद्वारे सलग तीन, चार वेळा सविस्तर चर्चा केली.

या चर्चेचे फलित म्हणून शेतकऱ्यांच्या (Farmers) मागणीचा संवेदनशीलपणे विचार करण्यात आला. ३१ मार्च २०२३ पर्यंत हरभरा खरेदीच्या नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली. हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी व्यक्त केली. या मुदतवाढीमुळे नाफेडमध्ये हरभरा विकणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

खरेदी केंद्रे वाढविण्यासाठी लढा सुरूच..

यादरम्यान जिल्ह्यातील हरभरा खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याचीही मागणीही आम्ही केल्याचे रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी सांगितले. गतवर्षी जिल्ह्यात ७५ हरभरा खरेदी केंद्र होते. परंतु यावर्षी अद्याप केवळ २४ हरभरा खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. मागील वर्षीप्रमाणे ७५ खरेदी केंद्र चालू व्हावेत, या मागणीसाठी आमचा लढा चालूच राहील, असेही तुपकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT