Rajendra patni and Amit Zanak
Rajendra patni and Amit Zanak Sarkarnama
विदर्भ

Washim जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाचे यश दोन्ही आमदारांना विचार करायला लावणारे...

राम चौधरी

Washim News: काल जिल्ह्यातील 278 ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहीर झाले. या निकालाचा कल महाविकास आघाडीकडे असला तरी काँग्रेस या निकालात माघारली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसची व्युव्हरचना पक्षाला मोठे यश देवून गेली आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनेही लक्षणीय यश संपादन केले आहे. या निकालात भारतीय जनता पक्ष माघारला असून खुद्द भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा कारंजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारली आहे. दुसरीकडे आमदार अमित झनक यांच्या मतदारसंघात माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या जनविकास आघाडीचे यश दोनही आमदारांना विचार करण्यास भाग पाडणारे आहे.

वाशीम (Washim) जिल्ह्यात 287 ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. निवडणूक प्रक्रीया सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायत अविरोध झाल्या. त्यामुळे 278 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. काल या निवडणूकीचे (Election) निकाल जाहीर झाले. या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सर्वाधिक ग्रामपंचायती ताब्यात घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्याखालोखाल उध्दव बाळासाहेब ठाकरे (Udhav Thackeray) शिवसेनेने एकाकी लढत दुसरा क्रमांक मिळविला तर काँग्रेस तिसर्या स्थानावर राहीली या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष माघारल्याचे चित्र समोर आले. वंचित बहुजन आघाडीनेही काही ग्रामपंचायत ताब्यात घेतल्या आहेत. तर रिसोड मालेगाव तालुक्यात माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या जनविकास आघाडीने लक्षणीय यश मिळविले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थामधे भाजपचा वावर अल्प..

देशात व राज्यात सत्तास्थानी असलेल्या भारतीय जनता पक्षाजवळ संसाधनाची वानवा नाही मात्र वाशीम सारख्या ग्रामीण प्राबल्य असलेल्या जिल्ह्यात भाजपकडे ग्रामीण भागात प्रभाव दाखविणारे राजू पाटील राजे, माजी आमदार विजय जाधव यांच्यासारखे मोजके नेते आहेत. भाजपने मात्र या दोन नेत्यांचा वापर करून ग्रामीण भागात आपली पकड घट्ट करण्याची संधी या निवडणुकीत गमावली आहे. शहरी तोंडवळा हा भाजपची या निवडणूकीत कमजोरी ठरली आहे. भारतीय जनता पक्षासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील टक्का वाढविण्याचे आव्हान आहे.

राष्ट्रवादीची रणनिती आली कामाला..

ग्रामपंचायत निवडणूकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गावागावात संपर्क सुरू केला होता. गावातील उभरते नेतृत्व हेरून उमेदवार्या दिल्या गेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी प्रत्येक गावाचे नियोजन केले. कारंजात युसूफ पुंजाणी यांनी बाजू सांभाळली तर मानोर्यात सुभाषराव ठाकरे यांनी संपर्क साधत निवडणूक पार पाडली. मंगरुळपिर गृहतालुकाच असल्याने चंद्रकांत ठाकरेंचे नियोजन या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला भक्कम साथ मिळाली.

आपलाच झेंडा अन आपलाच दांडा..

शिवसेनेत उभी फूट पडली असली तरी ग्रामीण भागात अजूनही उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा कार्यकर्ता संघर्ष करत असल्याचे चित्र समोर आले. कोणताही नेता नाही कोणाचेही मार्गदर्शन नाही या परिस्थितीत उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सैनिकांनी लक्षणीय यश मिळविले आहे. शिंदे सेनेलाही चांगलाच जनाधार मिळा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT