Uddhav Thackeray|  sarkarnama
विदर्भ

Maharashtra Assembly : उद्धव ठाकरेंकडून पेन ड्राईव्ह सादर

Maharashtra Assembly Winter Session : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद प्रश्न काय आहे ?

सरकारनामा ब्युरो

कारवार, निपाणी, बेळगावला मी कर्नाटकव्यापत महाराष्ट्र असे म्हणेल आणि जोपर्यंत सीमावादाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही. तोपर्यंत सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करा. असाच ठराव आपण दोन्ही सभागृहात मंजूर करुन तो केंद्र सरकारला पाठवावा. तसेच, सीमाभागातील ज्या ग्रामपंचायतींनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे, त्या ग्रामपंचायतींना राज्य सरकार बरखास्त करणार का?, असा सवालही ठाकरे यांनी केला.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचा हा लढा माणुसकीचा लढा आहे. मराठी माणसांसाठी हा लढा आहे. लोकशाही मार्गाने हा लढा सुरु आहे. मराठी माणसासाठी आपण एकत्र आलो, हा लढा दोन भाषांचा नाही. हा विषय सोडवणं गरजेचे आहे. हा लढा समजूत घेतला पाहिजे. असे ठाकरे म्हणाले.

Maharashtra Assembly Winter Session : नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधानपरिषदेत पेन ड्राईव्ह सादर केला. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाबाबत यात माहिती आहे. हा प्रश्न काय आहे, हे या माध्यमातून समजेल, असे ठाकरे म्हणाले.

 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT