Washim Yavatmal Development Fund; Eknath Shinde and MP Sanjay Deshmukh sarkarnama
विदर्भ

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंची तोफ धडाडण्याआधीच एकनाथ शिंदेंकडून डॅमेज कंट्रोल; आणखी एका फुटीर खासदाराला कोट्यवधींचा निधी

Eknath Shinde Sanctions Fund for MP Sanjay Deshmukh Washim Yavatmal Development : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरद्वारे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. शिंदेंनी ठाकरेंचे 6 खासदार फोडत राज्यातील ऑपरेशन टायगर झाल्याचे म्हटलं होते.

Aslam Shanedivan

Washim Yavatmal Development Funds News : महाराष्ट्रातील राजकीय घडामोठींना सध्या जोरजार वेग आला असून राजकीय घडमोडी घडताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठे खिंडार पडले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. शिंदेंनी ठाकरेंचे 6 खासदार फोडले आहेत. यामुळे माजी मुख्यमंत्री तथा उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन त्यांचा समाचार घेणं सुरू केलं आहे.

या दौऱ्याची सुरूवात इशान्य मुंबईतून करत आज विदर्भात फुटलेल्या खासदारांवर सडकून टीका केलीय. यावेळी त्यांनी खासदार संजय देशमुख यांच्याच मतदारसंघात सभा घेत ठाकरेंची तोफ डागली. पण याआधीच देशमुख यांच्या मतदारसंघाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोट्यावधींचा विकास निधी मंजूर केला आहे. याबाबत खासदार देशमुख यांनीच पोस्ट करत माहिती दिली आहे.

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑपरेशन टायगरनंतर फुटलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे. फुटीर खासदारांच्या विरोधात रान उठवताना पहिल्यांदा ते यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांच्या मतदारसंघात पोहोचले. यावेळी देशमुख यांच्यावर जोरदार टीका करताना त्यांचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीवेळचा एका व्हिडीओ भर सभेत दाखवला आणि 'हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि परत मैदानात उतरा.', असे आव्हान दिले. तसेच देशमुख यांच्या मतदारसंघातील वाशिम विधानसभेसाठी उमेदवारी देखील घोषित केली.

या सर्व घडामोडीमुळे यवतमाळ-वासिमचे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र आहे. पण एकनाथ शिंदेना याची आधीच शंका असल्याने त्यांनी ठाकरे देशमुख यांच्या मतदारसंघात येण्याच्या आधीच मोठी खेळी खेळली आहे. खासदार देशमुख यांची बाजू भक्कम कर वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघासाठी भरीव निधी मंजूर केला आहे.

वाशिम-यवतमाळ मतदार संघातील विविध कामांसाठी नऊ कोटी चाळीस लाख रूपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. फुटलेल्या खासदारांनी आपल्या मतदारसंघात विकास निधी मिळत नसल्याचे कारण समोर देत शिवसेनेत प्रवेश केला होता. तर ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. यानंतर आता शिंदेंनी फुटलेल्या दुसऱ्या खासदाराला दिलेला शब्द पाळत 9 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर केला आहे.

यावरून संजय उत्तमराव देशमुख यांनी आपल्या फेसबूकवर पोस्ट केली आहे. त्यांनी, यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या नागरी विकासासाठी केंद्र सरकारकडून तब्बल ₹ ९० कोटी ०८ लाख ०४ हजार ३५८ रुपयांचा ऐतिहासिक निधी मंजूर केला आहे. हा निधी नगरपरिषद, नगरपालिका व नगरपंचायतींच्या नागरी विकासासाठी केंद्र सरकारच्या १५ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत मंजूर करण्यात आला आहे.

तर या निधीतून स्वच्छता, पाणीपुरवठा व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, हरित विकास आणि नागरिकांसाठी आवश्यक नागरी सुविधांची विविध विकासकामे हाती घेण्यात येणार असून, प्रलंबित विकासकामांना मोठी गती मिळणार आहे. यवतमाळ-वाशिमच्या नागरी विकासासाठी केंद्र सरकारच्या १५ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत भरीव निधी मंजूर केल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन, केंद्रीय वित्त मंत्रालय तसेच भारत सरकारचे मनःपूर्वक आभार! असे खासदार संजय देशमुख यांनी म्हटलं आहे.

ओम राजेनिंबाळकर यांना मोठा निधी

दरम्यान शिंदे यांनी धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यासाठी निधीचा पेटारा पहिल्यांदा उघडला. ओम राजेनिंबाळकर यांना मोठा निधी धाराशिवमधील विविध विकास कामांसाठी उपलब्ध करून दिला. शिंदे मार्फत 18 कोटीचा निधी मिळाल्याची माहिती ओम राजेनिंबाळकरांनीच फेसबुक पोस्ट करत दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT