Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

Uddhav Thackeray : उध्दव ठाकरे अडचणीत? रवि राणांच्या खळबळजनक आरोपांनंतर शंभूराज देसाईंची मोठी घोषणा

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray : दिशा सॅलियन आत्महत्येप्रकऱणी भाजप,शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यात आता अपक्ष आमदार रवि राणा यांनी उमेश कोल्हे यांच्या हत्यप्रकऱणी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केले आहेत. या आरोपांनंतर शंभूराज देसाई यांनी या प्रकरणी राज्य गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात येईल अशी घोषणा केली आहे. यामुळे आता उध्दव ठाकरें (Uddhav Thackeray) च्या अडचणीत देखील वाढ होणार आहे.

अमरावती येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे ह्त्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कोल्हे यांच्या हत्येनंतर तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना हे प्रकरण दाबण्यासाठी फोन केला होता असा गंभीर आरोप करत या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील केली आमदार रवि राणा यांनी केली आहे.

आमदार रवि राणा यांनी विधीमंडळ सभागृहात उमेश कोल्हे हत्येप्रकऱणावर उध्दव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केले आहे. राणा म्हणाले, अमरावती येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे हत्याकांड 33 महिन्यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालं. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. उमेश कोल्हे हिंदू विचाराचे होते. हिंदू विचारांचा प्रचार-प्रसार करत होते. जेव्हा नुपूर शर्माची हत्या झाली, त्यावेळी त्यांच्या समर्थनार्थ उमेश कोल्हेंनी पोस्ट व्हायरल केली. त्यावेळी त्यांना धमक्या आल्या. धमक्या आल्यानंतरही अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी हे गांभीर्यानं घेतलं नाही.

उमेश कोल्हेंना धमक्या येत असतानाही एक महिना अमरावती पोलिसांनी लक्ष दिलं नाही. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला. हा संपूर्ण तपास चोरी झाल्याच्या दिशेनं करा आणि ही केस दाबा असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. आणि या तपासाची दिशा बदलली असा आरोप देखील राणांनी सभागृहात केला आहे. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो की, उद्धव ठाकरेंनी केलेल्या फोनची व पोलीस अधीक्षकांची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे.

यावर शंभूराज देसाई म्हणाले, लक्षवेधी बाहेरचा हा प्रश्न आहे. मी लक्षवेधी पुरती माहिती घेतलेली आहे. तरीसुद्धा सभागृहात जे सदस्य बोलतात, ते सत्य मानून त्यावर कार्यवाही करायची असते. ज्या गोष्टीचा उल्लेख राणा यांनी केला, त्या अमरावतीतल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणात सविस्तर माहिती त्यांच्याकडून घेतली जाईल. त्यांचा आक्षेप तिथल्या पोलीस आयुक्तांवरती, त्यांच्या कार्यपद्धतीवर आहे. या संपूर्ण प्रकरणाचा राज्य गुप्तचर आयुक्तांकडून सविस्तर अहवाल 15 दिवसांत मागविला जाईल. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे तो सादर केला जाईल. अहवाल आल्यानंतर यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT