NCP Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

NCP Ajit Pawar : 'NCP'मध्ये भूकंपाचे संकेत? पक्ष नेतृत्वाला डावलून अजितदादांच्या 10 जिल्हाध्यक्षांची तातडीची बैठक

Meeting of 10 district presidents of Vidarbha of NCP Ajit Pawar group in Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विदर्भातील 10 जिल्हाध्यक्षांची नागपूरमध्ये एकत्र येत तातडीची बैठक होणार आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विदर्भातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले पदाधिकारी व कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. विदर्भात कोणी लक्ष देत नाही, जिल्हाध्यक्षांची कामे करीत नाही, मंत्री फक्त वेळ मारून नेतात आणि कुठलेही शासकीय पदे दिली जात नसल्याने मोठी नाराजी निर्माण झाली आहे.

यावर काय करायचे याकरिता आज सोमवारी विदर्भातील 10 जिल्ह्यांमधील शहर व जिल्हाध्यक्षांनी नागपूरमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात निर्माण झालेली नाराजी पक्ष कसे थोपवतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी पक्षाच्या ओबीसी सेलचे राज्य समन्वयक आणि प्रदेश सरचिटणीस ईश्वर बाळबुधे यांनी पुन्हा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी त्यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची घोषणा केलीय. त्या शरद पवार यांच्या संपर्कात आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला विदर्भात एकही जागा देण्यात आली नव्हती. विधानसभेच्या निवडणुकीत भाजप डावलणार असल्याची शंका आता जोर धरू लागलीय.

भाजपने (BJP) आपल्या कार्यकर्त्यांना सरकारी समित्या दिल्या. मात्र राष्ट्रवादीने जिल्हा नियोजन समितीची अपवाद वगळता विदर्भातील एकाही कार्यकर्त्याला मोठे शासकीय पद दिले नाही. नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तपदाची जागा रिक्त आहे. ती राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे. मात्र वर्षभरापासून अद्याप कोणाचीच नियुक्ती करण्यात आलेली नाही. मुंबईच्या बैठकीत विदर्भाचा विषय आल्यास तो पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पाठवला जातो. पटेल यांना विचारणा केल्यास मुंबईकडे बोट दाखवतात. अशा टोलवाटोलवीला राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी वैतागले आहेत.

पक्ष सोडणार नाही किंवा बंडही करणार नाही

ही कोंडी फोडण्यासाठी आज विदर्भातील सर्व 10 जिल्ह्यातील अध्यक्ष नागपूरमध्ये बैठक घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्षांची अशी एकत्रित बैठक पहिल्यादांच होत आहे. एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे जिल्ह्याध्यक्ष नाराज असल्याचे बोलले जाते. या सर्वांना काही तरी सांगयाचे आहे. याकरिता बैठक घेणार आहोत. मात्र कोणी पक्ष सोडणार नाही किंवा बंडही करणार नाही. बैठकीनंतर सर्व जिल्ह्याध्यक्षांचे म्हणणे आमच्या प्रदेशाध्यक्षांकडे आम्ही पोचवणार असल्याचे नागपूरचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT