Prakash Ambedkar News Sarkarnama
विदर्भ

Prakash Ambedkar News: आंबेडकरांनी घेतला कार्यकर्त्यांच्या घरी वऱ्हाडी जेवणाचा आस्वाद; रोडगे अन् वांग्याची भाजी

Akola Lok Sabha Constituency 2024: अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे, वंचितचे प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे डॉ.अभय पाटील यांच्यात तिहेरी लढत होत आहे. आंबेडकरांनी आज कॉर्नर सभा आणि पदयात्रांवर भर दिला आहे.

Mangesh Mahale

Akola News: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवार प्रचारासाठी वेगवेगळे फंडे वापरत आहेत. कॉर्नर सभा, पदयात्रा आणि वैयक्तिक गाठीभेटींवर सध्या त्यांचा भर आहे. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे (Akola Lok Sabha Constituency 2024) उमेदवार प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज हटके प्रचार केला.

शेतातील एका झाडाखाली बसत आंबेडकरांनी छोटी सभा घेतली. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांच्या घरी अस्सल वऱ्हाडी जेवणाचा आस्वाद घेतला. रोडगे आणि वांग्याची भाजीवर त्यांनी ताव मारला.

आंबेडकरांनी धोत्रा गावात एका शेतात कडूनिबांच्या झाडाखाली छोटीशी कॉर्नर सभा घेतली. सभेत आंबेडकरांचं एक वेगळेपण दिसून आले. झाडाखाली लोखंडी पेटीवर बसले, ना हातात कुठला माईक, ना लाऊड स्पिकर, अगदी शांतमय वातावरणात कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिसले. कार्यकर्त्यांसोबत विदर्भाच स्पेशल जेवण म्हणजे रोडगे आणि बटाटे-वांग्याची भाजीचा आस्वाद आंबेडकरांनी घेतला.

अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे डॉ.अभय पाटील यांच्यात तिहेरी लढत होत आहे. आंबेडकरांनी आज अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुर तालुक्यातील छोट्या-छोट्या कॉर्नर सभा आणि पदयात्रांवर भर दिला आहे.

अकोल्यातील जठारपेठ येथील भारत विद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रांगणावर संविधान उद्देशिका वाचनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी राष्ट्रध्वजातील तीन रंग असलेल्या केशरी, हिरव्या आणि पांढऱ्या रंगांच्या साड्या परिधान केल्या होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारतीय बौद्ध महासभा, स्वर्गीय धनश्री देव स्मृती प्रकल्प आणि नीलेश देव मित्र परिवार यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तीन हजार महिलांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. संविधान उद्देशिकोच्या 75 हजार प्रती या कार्यक्रमात वाटण्यात आल्या. कार्यक्रमाला प्रकाश आंबेडकर आणि अंजली आंबेडकर उपस्थित होत्या. यावेळी देश एकसंघ ठेवण्यासाठी लोकशाही वाचवणं आवश्यक आहे. यासाठी संविधान उद्देशिकेतील मुल्य वाचविणं आवश्यक असल्याचं आंबेडकरांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT