Vanchit Bahujan Aghadi Sarkarnama
विदर्भ

Uddhav Thackeray: युतीसाठी वंचितचे पाऊल पडले पुढे; ठाकरेंकडून मात्र प्रतिसाद नाही...

Vanchit Bahujan Aghadi : या युतीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे हात पुढे करण्यात आला आहे.

मनोज भिवगडे

Prakash Ambedkar, Uddhav Thackeray News : गेले काही दिवसांपासून शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीबाबत राज्यात चर्चा सुरू आहे. या युतीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे हात पुढे करण्यात आला आहे. मात्र, निवडणूक लढविण्याच्या मुद्यावर येऊन चर्चा थांबली असून, शिवसेनेला त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगण्यात आले आहे. शिवसेनेने अद्याप याबाबत भूमिका स्पष्ट केली नसल्याने चर्चेला तूर्तास ‘ब्रेक’ लागला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahuja Aghadi) प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी शिवसेना (Shivsena) आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत सुरू असलेल्या चर्चेसंदर्भात प्रसिद्धिपत्रक काढले आहे. त्यात शिवसेनेसोबत युती करण्याबद्दल चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. या बाबतीत वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने होकार कळवला असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले. ‘वंचित’च्या वतीने राज्य कमिटीचे सदस्य महेंद्र रोकडे, मुंबई (Mumbai) प्रदेशाध्यक्ष अबुल हसन व वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांची शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुभाष देसाई यांच्यासह शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Uddhav Thackeray) काही खासदार यांच्या बरोबर दोन बैठका झाल्या असल्याची माहितीही रेखा ठाकूर यांनी दिली.

या चर्चेत युतीसंबंधी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे त्या म्हणाल्या. शिवसेना नेते सुभाष देसाई हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना येऊन भेटले. त्यांच्यातही दोन बैठका झाल्या असून, युती संबंधी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे मान्य करण्यात आले आहे. सध्या या टप्प्यावर बोलणी झाली असून, वंचित बहुजन आघाडीतर्फे शिवसेनेला युतीबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले असल्याचेही रेखा ठाकूर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

निवडणूक चार पक्षांसोबत की, दोन पक्ष मिळून !

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिवसेनेला युतीबाबत होकार देण्यात आला आहे. मात्र, शिवसेनेसोबत युती झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाराष्ट्र विकास आघाडीचा भाग बनविणार आणि चार पक्षीय आघाडी करून निवडणूक लढवणार की, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष मिळून निवडणुका लढवणार हे शिवसेनेला स्पष्ट करायला सांगण्यात आले आहे. या बाबतीतला निर्णय शिवसेनेकडून घेण्यात आल्यानंतर युतीबाबतची पुढच्या टप्प्याची चर्चा सुरू होईल, असे वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT