MSRTC Bus Running With Broken Rooftop  Sarkarnama
विदर्भ

ST Bus Viral Video: छत तुटलेल्या बसचा व्हिडिओ व्हायरल; अभियंत्यांवर प्रशासनाची मोठी कारवाई

सरकारनामा ब्यूरो

Gadchiroli News: गडचिरोलीत एका छत तुटलेल्या एसटी बसचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. एसटी बसचे छत तुटलेले असतानाही प्रवाशांसह बस भरधाव वेगात जात असल्याचे या व्हायरल व्हिडिओत दिसून येत आहे. या प्रकरणी आता गडचिरोली महामंडळाचे यंत्र अभियंत्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

छत तुटलेल्या एसटी बसचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली. यावरून राज्यातील एसटी महामंडाळाची परिस्थिती किती बिकट झाली आहे, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. धोकादायक स्थितीत असणाऱ्या बसही धावत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

एसटी बसच्या व्हायरल व्हिडीओत एसटी बसचा पत्रा हवेत उडालेला असतानाही एसटीचा चालक ही बस भरधाव वेगाने चालवताना दिसत आहे. तर या बसच्या दुरुस्तीचे काम विभागीय कार्यशाळेमध्ये वेळेत न करण्यात आल्याने विभागीय यंत्र अभियंता, गडचिरोली, यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

या बसच्या दुरूस्तीचे काम वेळेत पूर्ण न करणे, या बसमध्ये त्रुटी असतानाही ती वाहतूकीसाठी रस्त्यावर उपलब्ध करून देणे, यासह आदी कारनांना जबाबदार धरून पुढील चौकशी पुर्ण होईपर्यंत, गडचिरोलीच्या विभागीय यंत्र अभियंता यांचे निलंबन करण्यात आले असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT