Vijay Wadettiwar ेोीकोीलोसो
विदर्भ

Badlapur School Crime Case : "बदलापूर प्रकरणावर भाजपच्या बहिणींचे तोंड कोणी शिवले?"

Vijay Wadettiwar News : "राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही," असा संताप वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

Rajesh Charpe

कुठल्याही घटनेवर आंदोलन करणाऱ्या आणि वचावचा बोलणाऱ्या भाजपच्या बहिणींचे बदलापूर घटनेवर तोंड कोणी शिवले? असा सवाल उपस्थित करून भाजप दुतोंडी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात शनिवारी नागपूरमधील संविधान चौकात काँग्रेसच्यावतीने तोंडाला आणि दंडाला काळ्या फिती बांधून आंदोलन केले. या घटनेचा निषेध नोंदवला. यावेळी विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar ) यांनी भाजपला चांगलेच खडेबोल सुनावले.

विजय वडेट्टीवार म्हणाले, "बंगालमध्ये घडलेल्या घटनेला तेथील सरकाराला जबाबदार धरले जात आहे. मात्र, महाराष्ट्रात अल्पवयीन मुली आणि महिलांवर अत्याचार होत असताना भाजपच्या महिला शांत बसल्या आहेत. यात त्यांना राजकारण दिसत आहे. महाविकास आघाडीचा 'बंद' राजकीय असल्याचे त्यांचे मत आहे."

"आम्ही राज्यात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात 'बंद' पुकारला होता. कुठल्याही सरकारच्या विरोधात नाही. महाविकास आघाडीने ( Mahavikas Aghadi ) महिलांवर अत्याचार रोखण्यासाठी व अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, याकरिता शक्ती कायदा तयार केला होता. तो मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला आहे. तो तातडीने मंजूर करण्याची गरज आहे," असेही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

"राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही. सर्वजण मलिदा चाटण्यात खुश आहेत. महाराष्ट्राची मान शरमेने खाली जात आहे. 'बंद'ला बेकायदेशीर ठरवले आहे. उच्च न्यायालयाचा पालन करत आम्ही 'बंद' मागे घेतला. पण, जनता 'बंद' करत असेल, तर आमचा विरोध नाही. जनतेत राग, चीड आहे. असे असताना सरकार 'लाडकी बहिणी'चे कार्यक्रम करत आहे. मात्र, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पीडित कुटुंबाच्या भेटीला जायला वेळ नाही," अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

"बदलापूर घटनेचा दोन सदस्यांनी अहवाल दिला. शाळा व्यवस्थापनाने आरोपीची नियुक्ती केली. घाणेरडे कृत्य नराधम करत होता. मेडिकलला विलंब झाला. बदलापूरमधील घटनेला शाळा समिती जबाबदार आहे. या अहवालात अनेक निष्कर्ष गंभीर आहे. पोक्सोप्रकरणात वेळकाढूपणा करता येत नाही. त्यातील तरतुदीनुसार संस्था चालकांवर गुन्हे दाखल होतील. आम्ही यासाठी राज्य सरकारला पत्र लिहिणार आहोत," असं वडेट्टीवार यांनी म्हटलं.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT