Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Vijay Wadettiwar News : आज आम्हाला आमदार म्हणवून घ्यायला लाज वाटते !

Pankaja Munde : पंकजा मुंडे मोठ्या नेत्या आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Congress Leader Vijay Wadettiwar on Today's Politics : पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटली आता कॉंग्रेस फुटणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. यामध्ये काहीही तथ्य नाहीये. काँग्रेस फुटणार हे बिनबुडाचं वक्तव्य आहे, असे राज्याचे माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले. (They will never succeed in breaking Congress)

आज (ता. ७) सकाळी नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कॉंग्रेस फोडण्यात त्यांना कधीही यश येणार नाही. उलट अशा फोडाफोडीच्या राजकारणामुळे जनतेच्या मनातून ते उतरले आहेत. पंकजा मुंडे यांनी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. यावर पंकजा मुंडे मोठ्या नेत्या आहेत. त्यांचे आम्ही काँग्रेसमध्ये स्वागत करू. त्या आल्यास आम्हाला त्यांचा फायदा होईल. त्या लोकप्रिय नेत्या आहेत. त्यांना समाजाचा पाठिंबा आहे. मराठवाड्यात जाऊन आम्ही त्यांचे स्वागत करू.

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. याबाबत विचारले असता, वंचितसारख्या समविचारी पक्षांची मोट बांधणं आता अनिवार्य झालं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत जायला आम्ही तयार आहोत, असे वडेट्टीवार म्हणाले. बोलघेवडे म्हणून फुले - शाहू - आंबेडकरांचं नाव घेणे आणि हिंदुत्वाचा अजेंडा चालवण्याचे काम सत्ताधारी करत आहे, असेही ते म्हणाले.

आम्ही तयारच असतो..

आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस तयार आहे. जनतेचा विश्वास आमच्यावर आहे. जे कमजोर आहेत, ते तयारी करतात. जे मजबूत आहेत ते सदैव तयारच असतात. आजही आमच्याकडे बरेच लोक यायला तयार आहेत. त्यासाठी फार वाट बघावी लागणार नाही.

सामान्यांच्या प्रतिक्रिया राजकारण्यांच्या तोंडात शेण घालणाऱ्या आहे. त्यांनी राजकारण येवढ नासवलं की, आज आम्हाला आमदार म्हणवून घ्यायला लाज वाटतेय. पण अशा स्थितीत काँग्रेसवरील जनतेचा विश्वास वाढतो आहे. बरीच मंडळी काँग्रेसमध्ये येणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

ज्याची संख्या जास्त, त्याचा विरोधी पक्षनेता..

ज्याची संख्या संख्या जास्त, त्याचा विरोधी पक्षनेता असतो. मी यापूर्वी विरोधीपक्ष नेता राहिलो आहे. पुन्हा जबाबदारी मिळाली तर आनंदाने स्वीकारेन. पण याबाबत हायकमांड निर्णय घेणार. न घाबरणारा, कुणाच्याही दबावात न येणारा नेता पाहून हायकमांड विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीत निर्णय घेत असते, असे म्हणत आमदार वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगितले.

विधानसभेच्या जागा ४०० करा..

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या सरकारमध्ये अजित पवार सहभागी झालेले आहेत. पवार सहभागी होताच सरकारमध्ये वादांना तोंड फुटले आहे. त्यांचेच आमदार नाराज आहेत.

काही लोकांनी नाराजी बोलून दाखवली आहे. त्यांच्या आमदारांना सांभाळायचे असतील, तर आता महाराष्ट्रात विधानसभेच्या ४०० जागा कराव्या लागणार आणि लोकसभेच्या १०० जागा तयार कराव्या लागतील, अशी मिश्‍कील टिपणी आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT