Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Vijay Wadettiwar on Ajit Pawar : 'हीच सद्‍बुद्धी त्यांना पक्ष फोडण्यापूर्वी आली असती, तर आज... ; वडेट्टीवारांचा अजित पवारांना टोला!

Rajesh Charpe

Vijay Wadettiwar Politics News : श्री गणेशाचे आगमन झाल्याने महाराष्ट्रात सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेते मंडळीपर्यंत प्रत्येकाच्या घरोघरी बाप्पाची स्थापना झाली आहे. तर राजकीय मंडळींकडून एकमेकांना शुभेच्छा देतानाही टोलेबाजीसुद्धा होतान दिसत आहे. यातच महायुतीवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे विरोधीपक्षनेते नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यावरील आरिष्ट येत्या दोन महिन्यात दूर होणार असल्याचे विधान केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी शरद पवार यांना सोडल्याची गडचिरोलीत उपरती झाली. हीच सद्‍बुद्धी त्यांना पक्ष फोडण्यापूर्वी आली असती तर आज पश्चाताप करण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. राष्ट्रवादी काँग्रेसने जी फोडाफोडी केली तेच आता त्यांच्या बाबतीत घडत आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मुलीने विधासभेची निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी शरद पवार यांच्यासोबत संपर्क साधला आहे. आता धर्मराव बाबा आत्राम माझ्या जावयाला आणि मुलील नदीत फेका म्हणत आहे. त्यांचे वक्तव्य नैराश्यातून आले आहे.

त्यांना खुर्चीपेक्षा दुसरे काही प्रिय नाही हेच यातून दिसून येत असल्याचा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. त्यांच्यासोबत घराघरा भांडणे लागली. तेच आता भांडणे लावू नका, घर फोडू नका असा सल्ला देत असल्याचे सांगत आहेत. असं विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) म्हणाले.

तसेच, गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी बांधव आहे. असे असताना नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापने मागचा उद्देश काय आहे अशी विचारणा करून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर(Devendra Fadnavis) निशाणा साधला.

आम्ही हे विद्यापीठ नाशिकऐवजी गडचिरोली जिल्ह्यात स्थापन करण्याची मागणी करणार आहोत. महाज्योतीचे मुख्यालय नागपूरमध्ये आहेत. मात्र प्रशिक्षण सेंटर पुण्यात स्थापन करण्यात आले हेसुद्धा अनाकलनीय आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना आम्ही महाज्योतीचे मुख्यालय नागपूरमध्ये सुरू केले.

महायुती सरकारला ओबीसीचे फक्त मते पाहिजे मात्र ओबीसींना काही द्यायचे नाही. सर्वाधिक उद्योग महाराष्ट्रात आले. इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली राज्य सरकारतर्फे सुरू केलेले दावे तकलादू आहेत. हिंमत असेल तर उद्योगमंत्र्यांनी आठ दिवसात श्वेतपत्रिका काढावी असेही आवाहन वडेट्टीवार यांनी केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT