Vijay Wadettiwar, Sambhaji Bhide Sarkarnama
विदर्भ

Vijay Wadettiwar News : विजय वडेट्टीवारांचा संभाजी भिडेंना इशारा; म्हणाले, 'लवकरच चक्की पिसिंग...'

संदीप रायपूरे

Chandrapur Political News : बेताल वक्तव्य करून समाजात विष कालविण्याचे काम भाजपच्या माध्यमातून मनोहर भिडे करीत आहेत. सरकार कारवाई करण्याचे सोडून त्यांनाच सुरक्षा देत आहे. येणाऱ्या काळात राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. त्यावेळेस मनोहर भिडेंचा 'चक्की पिसिंग-पिसिंग...' करू, असा इशारा विरोधी पक्षेनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. या विधानामुळे भाजप आक्रमक होऊन वडेट्टीवार यांच्यावर पलटवार होण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील क्रांतीभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिमुर येथे शनिवारी कार्यकर्ता मेळावा पार पडला. या वेळी वडेट्टीवार म्हणाले, सध्या राज्यात दादागिरी सुरू आहे, पण आम्ही दादागिरीची भाषा खपवून घेणार नाही. देशातील सत्ताधारी लोकशाही संपविण्यासाठीचे षडयंत्र करीत आहेत. एकीकडे दलित, आदिवासींना राष्ट्रपती करायचे, त्यांचा राजकीय फायदा करून घ्यायचा आणि दुसरीकडे त्यांना मंदिरात प्रवेश द्यायचा नाही. या मुद्द्यावर सरसंघचालक मोहन भागवत चूप राहतात,' असा घणाघात वडेट्टीवारांनी केला.

वडेट्टीवारांनी या वेळी भाजपवर सडकून टीका केली. 'भाजपने गडचिरोली चिमुर लोकसभा मतदारसंघ वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. येथील खासदार केवळ बॅनरवर झळकताना दिसतात. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकात भाजपला धडा शिकवून क्रांतीभूमीतून परिवर्तनाची नांदी करा,' असे आवाहन करून गडचिरोली चिमुर येथे काँग्रेसचा विजय निश्चित झाल्याचा विश्वासही विजय वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar) व्यक्त केला. ' मराठवाड्यात दुष्काळ घोषित करण्याचे पाऊल सरकारने अद्याप उचललेले नाही. दोन महिन्यांत तेराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सरकार सरसकट कर्जमुक्तीची घोषणा करेल असे वाटत होते. मात्र, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी सरकार मराठवाड्यात गेले काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

सरकारवर टीका करताना नाना पटोले म्हणाले, भाजपचे लोकशाही नष्ट करण्याचे काम करीत आहे. हे सरकार शेतकरीविरोधी असून, त्यांना फसविण्यासाठी सर्रासपणे खोटे बोलत आहे. चंद्रपूरबाबत भाजपने केलेल्या फसव्या आश्वासनाला बळी पडून नये, असे आवाहन पटोलेंनी केले. या वेळी माजी आमदार डॉ. अविनाश वारजुरकर, डॉ. सतीश वारजुरकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार नामदेव उसेंडी, आनंद गेडाम, बाळ कुळकर्णी, अतुल लोंढे, डॉ. विजय गावंडे, प्रमोद चैधरी, नेताजी मेश्राम आदी उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT