Vijay Wadettiwar and Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

Wadettiwar On Fadanvis : काहीतरी नक्की शिजत आहे; कारण हे सहज केलेलं ट्विट होतं, असं वाटत नाही !

Maharashtra Government : आरक्षण देण्याची ऐपत नसल्याने त्यामुळे सरकारने राजीनामा द्यावा.

Atul Mehere

Nagpur Political News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ‘मी पुन्हा येईन...’ चा व्हिडिओ भाजपनं ट्विट केला होता. त्यानंतर उडालेल्या गदारोळानंतर ते ट्विट डिलीट करण्यात आलं. यावर ट्विट करण्यामागे काहीतरी राजकारण नक्की शिजत आहे. कारण हे सहज केलेलं ट्विट होतं, असं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. पुन्हा येणार नसल्याची खात्री पटल्यानेच ते ट्विट डिलीट केलं असावं, असंही ते म्हणाले.

आज (ता. २८) सकाळी पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवारांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं. ते म्हणाले, पूर्वीसुद्धा मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारने घेतलेला निर्णय केंद्राला विचारून घेतला नव्हता. आरक्षणावरून स्थिती चिघळत असताना केंद्राने त्यात हस्तक्षेप करणे अपेक्षित असताना केंद्र सरकार त्यासाठी नकार देत आहे. आज जी परिस्थिती झाली आहे, त्याला राज्य सरकार जबाबदार आहे. आरक्षण देण्याची ऐपत नसल्याने त्यामुळे सरकारने राजीनामा द्यावा.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्याला अधिकार नसताना त्यांनी कुठल्या भरवशावर मराठ्यांना शब्द दिला. जरांगे पाटील यांनी तरी ४० दिवस सरकारवर भरोसा का ठेवला, असा सवाल करत राज्य सरकार या काळात केंद्रात गेले नाही आणि मुदत संपल्यावर गेले. आता साप गेल्यावर आता लाठी मारून काय उपयोग होणार आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

एक बाशिंग बाधून दोघे तयार आहेत. त्यांचा सत्ता येणार नाही. तरीही हे नवरदेव का होऊन बसत आहेत, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. आताच सरकार केवळ अध्यक्षांच्या भरवशावर आहे. २०२४ मध्ये महाविकास आघाडीच सत्तेत येईल. आता आम्हाला कोणी रोखू शकणार नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र होत चालले आहे. ‘आरक्षण नाही, तर शाळेतही जाणार नाही’ अशी भूमिका घेते जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थीही आंदोलनात उतरले आहे. यावर प्रस्तावित मराठा समाज लढत आहे, ही वेळ का त्याच्यावर का आली याचे आत्मचिंतन केले पाहिजे. आरक्षण वेगळा भाग पण विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे नुकसान करू नये, आयुष्य उद्ध्वस्त करू नये, अशी विनंती पालकांना वडेट्टीवार यांनी केली.

महाराष्ट्रात एकच पक्ष सत्तेत आणि विरोधातदेखील आहे. ‘दिया जब बुझता, है तो ज्यादा फडफडाता है.’ तशी यांची स्थिती झाली आहे, असे म्हणत त्यांनी राज्यकर्त्यांना जोरदार टोला लगावला. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर बोलताना दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे कोण कोणाला भेटतो, हे पाहावं लागेल सुप्रीम कोर्ट सोमवारी, ३० ऑक्टोबरला निर्णय देईलच, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT