Vijay Wadettiwar and Narendra Modi Sarkarnama
विदर्भ

Wadettiwar On Modi : कौतुक व्हायलाच पाहिजे, पण शास्त्रज्ञांच्या कौतुकामागे अजेंडा निवडणुकीचा दिसतोय !

Sharad Pawar : पवारांच्या भूमिकेने निश्चितचपणे ‘इंडिया’चा फायदा होणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Political News : शरद पवार यांच्या भूमिकेवरून सर्वत्र चर्चा सुरू आहे. नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान शरद पवार पुरोगामी विचारला धरून राहतील. त्यांच्या भूमिकेमागे काही तरी नक्कीच दडलं आहे, ते देशात ‘इंडिया’सोबत तर राज्यात महाविकास आघाडीसोबत आहेत. इतरांना विसंगती दिसत असली तरी आम्हाला ती दिसत नाही, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. (While others may see inconsistencies, we do not)

आज (ता. २६) सकाळी नागपुरात नागपुरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पवार साहेब जेष्ठ आणि हुशार नेते आहेत. ते जेव्हा भूमिका मांडतात, त्यामागे मोठा विचार असतो. त्यामुळे पवारांच्या भूमिकेने निश्चितचपणे ‘इंडिया’चा फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही वडेट्टीवारांनी टिका केली. नावं ठेवण्यात पंतप्रधान पटाईत आहेत, असे ते म्हणाले.

त्यांनी आता ‘शिवशक्ती’ हे नाव दिलं आहे. पंतप्रधान शास्त्रज्ञांना भेटायला गेले, याचा मनस्वी आनंद आहे. चंद्रयान तीन मोहीम यशस्वी केली. त्यासाठी शास्त्रज्ञांचं कौतूक व्हायला पाहिजे. परंतु नाव शास्त्रज्ञांचा घेऊन अजेंडा मात्र निवडणुकीचा असल्याचं दिसून आलं. यातून निवडणूकीत त्यांना काही फायदा होते का ते पाहुया, असे म्हणत वडेट्टीवारांनी भाजप नेत्यांना डिवचले. आजचा रोड शो मोदींनी शास्त्रज्ञांना सोबत घेऊन केला असता, तर त्यांना आनंद झाला असता, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांचा सन्मान केला गेला नाही, भाजपचा ना लढाईचा इतिहास आहे, ना देश उभारणीचा आणि आता देशाची विभागणी करू इच्छित असतील, तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. फोन टॅपींग प्रकरणात सीबीआय अपयशी ठरली. आरोपींना पाठीशी घालण्याचा आणि वाचवण्याचा हा प्रकार आहे. अगोदर जागतिक पातळीवर सीबीआयचं नाव होत. पण आता या संस्थेत वाटेल त्या पद्धतीने काम सुरू आहे. सीबीआय ही सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालणारी संस्था झाली आहे.

अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) गटांबद्दल ज्या चर्चा सुरू आहेत, तो विषय निवडणूक आयोगाकडे आहे. अजित पवार यांचा कायमचा बंदोबस्त करणारं पाऊल शरद पवारांनी उचललं आहे, असे वाटतं. त्यावर अधिक अर्थ काढणं संयुक्तिक नाही. कोण, कुठून लढणार, हे मी ठरवणार नाही आहे. आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी त्याबाबत काय ते ठरवतील, असे वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT