Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Vijay Wadettiwar News: … तर या देशात लोकशाही फक्त नावालाच राहील, असं का म्हणाले वडेट्टीवार ?

Raipur Convention : अधिवेशनात आलेल्या प्रतिनिधींमध्ये उत्स्फूर्तपणा होता, एक जोश होता.

सरकारनामा ब्यूरो

Nagpur News : रायपूर येथे झालेल्या अधिवेशनाने कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याला ऊर्जा दिली आहे. ५० टक्के मागासवर्गीयांना हिस्सा देण्याचा ठराव या अधिवेशनात मांडण्यात आला आणि तसा निर्णयही घेण्यात आला. दलित, आदिवासी, ओबीसी लोकांना जोडण्याचं काम या निमित्तानं होणार आहे. त्यामुळे आता सत्तापरिवर्तन होणार, हे निश्‍चित आहे. असे माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले.

विशिष्ट लोकांच्या डोक्यावर हात ठेवून, सध्या जे सरकार चाललेलं आहे. कथनी आणि करणीमधला केंद्र सरकारचा जो फरक दिसतो आहे, तो जनतेसमोर मांडायचा आहे. या अधिवेशनात आलेल्या प्रतिनिधींमध्ये उत्स्फूर्तपणा होता, एक जोश होता. अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांची भाषणं आणि त्यांनी दिलेला संदेश हा नक्कीच कॉंग्रेसला नवी उभारी देणार ठरणार आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व विरोधकांना एकत्र येऊन देशात सत्ता परिवर्तन करण्याची गरज आहे, हा संदेश रायपूरच्या अधिवेशनातून दिला गेला आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण थांबवून सत्ता केंद्रित करावी लागणार आहे. सत्याग्रही आणि सत्ताग्रही हा फरक देशातील लोकांना कळलेला आहे. दुसऱ्या राजकीय पक्षांतील लोकांना आपल्याकडे वळवा, नसतील येत, तर त्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावा आणि मिळेल त्या मार्गाने सत्ता हस्तगत करा, हे सर्व आता थांबलं पाहिजे, असाही एक मतप्रवाह या अधिवेशनात असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

या अधिवेशनातून एक नवी ताकद, नवी ऊर्जा कॉंग्रेसला (Congress) मिळणार आहे आणि कॉंग्रेस नव्या जोमानं देशात सत्ता परिवर्तन करण्याच्या दिशेने निघाली आहे. या अधिवेशनाचे हे मोठे फलित आहे. सध्या सुडाचे राजकारण (Politics) सुरू आहे. आमच्या विरोधी पक्षाकडे त्यांची स्वतःची लोक नाहीत. त्यामुळे आमच्या लोकांना वाट्टेल त्या मार्गाने आपल्याकडे आणण्यासाठी प्रयत्न केले गेले आणि आजही केले जात आहेत. अशा पद्धतीने राजकारण करणे अत्यंत दुर्दैवी आहे, असेही आमदार वडेट्टीवार म्हणाले.

सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना नामोहरम करावे, निश्‍चित करावे. पण ते विचारांनी झाले पाहिजे. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे, पण येथे विरोधकांचा गळा घोटून त्यांना नामोहरम केले जात आहे. ही लोकशाही नाही, तर लोकशाही संपवण्याचे त्यांचे प्रयत्न तिसऱ्या, चौथ्या पायरीवर आलेले आहेत. २०२४मध्ये सत्ता परिवर्तन झाले नाही, तर या देशात लोकशाही फक्त नावाला राहील. सत्ता, संपत्ती आणि प्रशासन हातात ठेऊन लोकशाही (Democracy) संपवायची हे सत्ताधाऱ्यांनी सध्या ठरवलेले दिसते आहे, असेही विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT