Abhijeet Wanjari and Balasaheb Thackeray
Abhijeet Wanjari and Balasaheb Thackeray Sarkarnama
विदर्भ

Wanjari : लपूनछपून बाळासाहेबांचे भाषण ऐकायला गेलो होतो, आमदार वंजारींनी सांगितला 'तो' किस्सा !

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Legislative Council News : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे मुंबईची लाइफलाइन होते, येवढेच नव्हे तर ते महाराष्ट्र राज्याची लाइफलाइन होते, अशा शब्दांत नागपूर पदवीधर मतदारसंघाचे कॉंग्रेसचे आमदार आमदार अभिजित वंजारी यांनी आज सभागृहात बाळासाहेबांचा उल्लेख केला. (I am opposed to what Praveen Darekar said)

भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज सभागृहात मुंबईच्या विकासाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाच्या विरोधात बोलताना आमदार वंजारी म्हणाले, २०१४ पूर्वी मुंबईत काहीच काम झाले नाही, या प्रवीण दरेकरांच्या म्हणण्याला माझा विरोध आहे. कोरोनाच्या काळात जग स्तब्ध झालं होतं. त्या संकटाचा सामना करण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठ्या ताकदीने केले, असे आमदार वंजारी म्हणाले.

देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने अधिक चांगल्या पद्धतीने स्थिती सांभाळली. त्यासाठी ठाकरेंना पुरस्कृतही करण्यात आले. घराच्या बाहेर निघत नसल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत असला तरी, पॉप्युलर टीव्ही शो प्रमाणे उद्धव ठाकरेंना बघण्या-ऐकण्यासाठी लोक त्यांची वाट बघत होते. त्याच्या कार्याला चांगली पसंती मिळाली. २०२१ मध्ये अनेक प्रकल्पांना महाविकास आघाडी सरकारने मान्यता दिली ती ठाकरेंच्याच नेतृत्वात, असेही त्यांनी सांगितले.

ठाकरेंनी ताकदीने राज्य सांभाळले. मुंबईची लाइफलाइन म्हणजे बाळासाहेब ठाकरे आहेत. केवळ मुंबईच नाही तर महाराष्ट्र राज्याची लाइफलाइन ते आहेत, असा त्यांचा दबदबा होता. नागपुरात एकदा बाळासाहेबांची सभा होती. तेव्हा मी एनएसयुआयमध्ये काम करत होतो. त्यांना पाहण्याची आणि प्रत्यक्ष त्यांचे भाषण ऐकण्याची खूप ओढ होती.

मग काय, आम्ही कॉंग्रेसचे (Congress) असतानासुदधा त्यांचे भाषण ऐकायला जायचे ठरवले. मी आणि माझे काही सहकारी तेव्हा लपूनछपून बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) भाषण ऐकायला गेलो होतो, असा किस्सा आमदार वंजारींनी सांगितला. आता त्यांच्या पक्षाचे दोन तुकडे झाले झाले, राज्यातील लोकांना त्याचे दुख झाल्याचेही ते म्हणाले.

राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींवर प्रशासक नेमलेले आहेत. मुंबई महानगरपालिकेने २०२३-२४ मध्ये ५२ हजार कोटीचा अर्थसंकल्प सादर केला. तेव्हा १५ हजार कोटींच्या मुंबईकरांच्या ठेवी काढून घेतल्या. यावर अंकुश लागला पाहिजे. भेदभाव केला जात आहे.

याविरोधात महानगरपालिकेवर (Municipal Corporation) मोर्चा काढला पाहिजे. प्रशासकांच्या माध्यमातून जे प्रकल्प सुरू आहेत, त्याची चौकशी झाली पाहिजे. कारण सर्वत्र मनमानी कारभार सुरू आहे. निवडणुका झाल्या नाही तर अधिकाराचे केंद्रीकरण होईल, असे दरेकरांच्या प्रस्तावाच्या विरोधात बोलताना आमदार वंजारी (Abhijeet Wanjari) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT