Manikrao Thakare Sarkarnama
विदर्भ

Congress vs BJP Maharashtra farmers : मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांचं 'अर्ज नाटक'; काँग्रेसच्या बड्या नेत्यानं पकडलं अन् सांगितलं!

Manikrao Thakare Slams Devendra Fadnavis Over Amit Shah Farmers Aid Request in Washim : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी वाशिम दौऱ्यात भाजप सीएम देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

Pradeep Pendhare

Manikrao Thakare criticism BJP : राज्यात अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या मदतीवरून सत्ताधारी भाजप महायुती आणि विरोधक महाविकास आघाडीत घमासान सुरू आहे. विरोधकांनी सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयांच्या मदतीची मागणी करताना, कर्जमाफीची मागणी लावून धरली.

सत्ताधारी आणि विरोधक दोघेही शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून मदतीचे आश्वासन देताना दिसत आहे. यातून दोन्ही बाजूने जोरदार तू तू-मैं मै सुरू आहे. असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कसं 'अर्ज नाटक' सुरू असून, ते काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पकडलं आहे.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं (Farmer) मोठं नुकसान झालं आहे. उभी पिक जमिनीसह वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही पाणी आणि चिखल आहे. यात सरकारने शेतकऱ्यांसाठी, पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या मदतीवरून विरोधकांनी दबाव वाढवला आहे. यातून सत्ताधारी आणि विरोधकांची एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे.

वाशिम दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे (Congress) माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी भाजप महायुती सरकारवर जोरदार टिका केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं नाटक कसं सुरू आहे, यावर घणाघात केला. अमित शहा दौऱ्यावर असताना, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या अर्जावरून जोरदार चिमटा काढला.

माणिकराव ठाकरे यांनी, "अमित शहा महाराष्ट्रात आले तेव्हा तुम्ही अर्ज देण्याचं नाटक केलं असून, आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी, असा अर्ज दिल्याचं मी पाहिलं नाही. राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे नुकसानीचा प्रस्ताव जायला पाहिजे होता. त्यात आकडेवारी टाकायला पाहिजे होती. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अर्ज दिल्यासारखं नाटक केलं असून हे दिशाभूल करणार आहे," असा घणाघात केला.

ठाकरेंचा गंभीर

'लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होत्या, त्यावेळी जानेवारी 2024 मध्ये तुम्ही नुकसान भरपाईसाठी जीआर काढला, हेक्टरी 13 हजार 600 रुपयांचा, तर आता मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानंतर आता तुम्ही हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयांचा दुसरा जीआर काढून दिशाभूल केली आहे,' असा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी वाशिम इथं माध्यमांशी बोलताना केला.

खरडून गेलेल्या शेतीसाठी मोठी मागणी

अतिवृष्टीमुळे वाशिम इथं झालेल्या शेती नुकसानीची माणिकराव ठाकरे यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये, तर खरडून गेलेल्या शेतीसाठी एक लाख ते पाच लाख रुपयांपर्यंत सरकारने मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT