MLA Nitin Deshmukh with Others
MLA Nitin Deshmukh with Others Sarkarnama
विदर्भ

Water Struggle Yatra : आंदोलन करण्यासाठी नाही, तर उपमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलो !

मनोज भिवगडे

शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांना उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली. त्यावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी पोलिसांना पत्र देऊन आम्ही आंदोलन करण्यासाठी नाही तर उपमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलो आहे, असे कळवले आहे.

खारपाणपट्ट्यातील नागरिक जे खारे पाणी पीत आहे, ते उपमुख्यमंत्र्यांना देणार आहोत. शांततेच्या मार्गाने आम्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नच उद्‍भवत नसल्याचे शिवसेनेने दिलेल्या पत्रात म्हटले आहे. खारपाणपट्ट्यातील ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेची मान्यता रद्द करण्यात आल्यामुळे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोला ते नागपूर पायदळ संघर्ष यात्रा काढली आहे.

ही संघर्ष यात्रा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर धडक देणार आहे. आमदार देशमुख नागपूरच्या सीमेवर पोहोचताच पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून यात्रेला परवानगी देण्यात आली नाही. शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांना नोटीस बजावून आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वातील संघर्ष यात्रा घेवून उपमुख्यमंत्र्यांच्या खासगी निवास स्थानी जाण्यास मनाई करण्यात आली. शिवाय नागपूरमध्ये इतरत्र कुठे आंदोलन करण्यासाठी रीतसर परवानगी घेण्याची सूचनाही पोलिसांनी केली.

बाळापूर येथील शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी पाणीपुरवठा योजनेची मान्यता रद्द करण्याचा आदेश मागे घेण्याच्या मागणीसाठी १० एप्रिल रोजी अकोल्यातून नागपूरपर्यंत पायदळ संघर्ष यात्रा काढली आहे. ही यात्रा आज सायंकाळी नागपूरच्या सीमेवर दाखल झाली.

नागपुरात प्रवेश करण्यापूर्वीच पोलिसांनी (Police) आमदार देशमुख (Nitin Deshmukh) यांना उपमुख्यमंत्र्यांच्या (Devendra Fadanvis) खासगी निवासस्थानी आंदोलन करता येणार नसल्याबाबतचे सूचनापत्र पाठविले आहे. नागपूर येथील विशेष शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जगताप यांनी हे पत्र शिवसेनेचे अकोला जिल्हाध्यक्ष गोपाल दातकर यांना पाठविले आहे.

काय म्हटले आहे पत्रात?

-नागपूर (Nagpur) शहरात सध्या ३७ (१) (३) म.पो.का. अन्वये मनाई आदेश लागू आहे. त्यामुळे कार्यक्रमाला परवानगी देता येणार नाही.

- त्रिकोणी पार्क, नागपूर येथील उपमुख्यमंत्र्यांचे खासगी निवास स्थान आहे. त्या ठिकाणी आंदोलनास किंवा लोकांना एकत्रित जमा होण्यास स्पष्टपणे नाकारण्यात येत आहे.

- आंदोलन करावयाचे असल्यास रीतसर अर्ज करावा. कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेवून परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात येईल.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT