Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

Assembly Session News: आम्ही रेशीम बागेत गेलो; गोविंद बागेत नाही गेलो : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : नागपूरच्या (Nagpur) रेशीम बागेत (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय) गेल्यानंतर आम्हाला काय काय म्हणून हिणवलं. कोण रेशीम किडा म्हणालं. पण, आम्ही खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचाराचे सरकार स्थापन केले आहे. बाळासाहेबांचे विचार आमच्या डोक्यात आहेत. आमच्या रक्तात बाळासाहेबांचे विचार आहेत. बाळासाहेबांना अभिप्रेत असणारे कामच आम्ही करतो; म्हणूनच आम्ही रेशीम बागेत (Reshim Bagh) गेलो, गोविंद बागेत (Govind Bagh) गेलो नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर पलटवार केला. (We went to the Reshim Bagh; Did not go to Govind Bagh: Eknath Shinde)

रेशीम बागेत गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. रेशीम बागेत मंतरलेली लिंब वैगेरे टाकली आहेत का. उद्या हे संघाच्या कार्यालयावरही दावा करतील, असा टोमणा ठाकरेंली शिंदे यांना लगावला होता. त्याला पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सणसणीत शब्दांत प्रत्युत्तर दिले.

आमच्यावर कुठल्या कुठल्या प्रकारची टीका करतात. काय काय आरोप करताहेत आमच्यावर. ही पुरोगामी महाराष्ट्राची शोकांतिका आहे. रेशीम बागेत गेल्यानंतर आम्हाला काय काय म्हणून हिणवलं गेलं. कोण रेशीम किडा म्हणाला. आणखी काय काय म्हणाले. पण, आम्ही खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे सरकार स्थापन केले आहे. बाळासाहेबांचे विचार आमच्या डोक्यात आहेत. बाळासाहेबांना अभिप्रेत असणारे काम आम्ही करतो; म्हणूनच आम्ही रेशीम बागेत गेलो, गोविंद बागेत गेलो नाही, असा टोमणाही शिंदे यांनी लगावला.

मुख्यमंत्री म्हणाले की, बाळासाहेबांचे फोटो चोरले. आमची हिम्मत चोरून दाखवा, हिम्मत असेल तर मैदानात येऊन लढा, असेही आव्हान आम्हाला दिले. अशी काय, काय आव्हाने आम्हाला देातात. मी त्यावर बोलणार नव्हतो. पण, रोजच तेच तेच चालू आहे. सहन करायलाही एक मर्यादा असते. कुणावर आरोप करताय. ज्याला सर्व अंडीपिल्ली माहिती आहेत. तसेच, जे घरातून बाहेरच पडत नाहीत, त्यांनी हिम्मत दाखवण्याची भाषा करणे म्हणजे एक विनोदच आहे. कारण, रस्त्यावर उतरून लढणारे आम्ही आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT