मराठा समाज आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे आणि ओबीसीचे आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यातील वाद आता चांगलाच वाढत चालला आहे. दोघेही एकमेकांना आव्हान देत आहे. जरांगे यांच्या पाडपाडीच्या आवाहनाला लक्ष्मण हाके यांनीसुद्धा पाडापाडीनेच प्रत्युत्तर देण्याचे ठरवले आहे. जरांगे यांना रसद पुरवणाऱ्या व त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत पाडणार असल्याची घोषणा त्यांनी आज नागपूरमध्ये केली.
मनोज जरांगे(Manoj Jarange) यांना छुपी मदत करणारे आणि रसद पुरवणाऱ्या पुणे आणि मुंबईतील काही लोकांची यादी आपण तयार केली आहे. त्या सर्वांना विधानसभेच्या निवडणुकीत पाडण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यांच्या मतदारसंघात आम्ही काम करणार आहोत. प्रत्येक मतदारसंघातील सर्वच समाजातील लोकांची यादी तयार केली जाईल. लोकांची मते जाणून घेतली आहे. हे मी हवेत बोलत नाही, असाही दावा यावेळी हाके यांनी केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी नेता म्हणून वावरतात. ते ज्या जातीचे आहे ती ओबीसीत आहे. मात्र ओबीसींच्या आरक्षणावर ते ठाम भूमिका घेत नाहीत. विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचीसुद्धा भेट घेतली. त्यांनी नागपूरमध्ये ओबीसी आंदोलकांना पाठिंबा दिला होता. आम्हाला ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी ज्यांची मदत लागेल त्यांची घेऊ. काँग्रेसनेते राहूल गांधी ओबीसी आरक्षणावर सकारात्मक आहेत.
मात्र त्यांच्या पक्षाचे बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यावर बोलत नाहीत. याकरिताच राहूल गांधी यांची भेट घ्यायची आहे. वडेट्टीवार यांना भेटून त्यांची राहूल गांधी यांची वेळ मिळवून द्यावी अशी त्यांना विनंती केली. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केल्यास निवडणुकीत पराभव होईल याची भीती नेत्यांना वाटते. मात्र ओबीसींची भीती वाटत नसल्याचेही हाके म्हणाले.
(Edited by _ Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.