Congress  Sarkarnama
विदर्भ

Congress : पदवीधरसाठी काँग्रेसकडून डॉ. तांबे जवळपास निश्चित; मात्र अमरावतीचे काही ठरेना...

सरकारनामा ब्युरो

Legislative Council Election : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये नाशिक व अमरावती विभाग पदवीधर, तर औरंगाबाद, नागपूर व कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीसाठी ३० जानेवारी २०२३ ला मतदान होणार आहे. तर २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. यासाठी १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहेत.

या पार्श्वभूमीवरच आता सर्वच पक्षाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. यामध्ये पदवीधर मतदार संघाच्या नाशिक आणि अमरावती या दोन जागा काँग्रेस लढवणार असल्याची चर्चा आहे. मात्र यामध्ये काँग्रेस (Congress) कोणाला संधी देतं? ते पाहणं महत्वाचं असणार आहे.

अमरावती पदवीधर मतदार संघासाठी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सुधीर ढोणे, माजी अर्थ राज्य मंत्री सुनील देशमुख, काँग्रेसमधील वजनदार नेते समजले जाणारे श्रीकांत जिचकर, अमरावती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू उर्फ अनिरुद्ध देशमुख यांच्या नावाची चर्चा होत आहे.

तर अमरावती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू उर्फ अनिरुद्ध देशमुख यांनी २०१९ मध्ये बच्चू कडू यांना लढत दिली होती. तसेच त्यांचे अमरावतीमधील सहकार क्षेत्रात वजन असल्याचे बोलले जाते. त्यामुळे अमरावती पदवीधर मतदार संघासाठी काँग्रेस आता नेमकं कोणाला उमेदवारी जाहीर करतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे.

तसेच नाशिक पदवीधर मतदार संघासाठी काँग्रेसकडून डॉ.सुधीर तांबे यांचे नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. कारण डॉ.सुधीर तांबे हे विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते असून २००९ पासून त्यांची नाशिक पदवीधर मतदार मतदारसंघावर चांगली पकड आहे. तसेच ते काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे मेव्हणे आहेत. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदार संघासाठी काँग्रेसकडून त्यांच नाव निश्चित मानलं जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT