Prakash Ambedkar Sarkarnama
विदर्भ

Ambedkar : अठरापगड जातींतील लोक पुजारी का नाहीत ? गोंडपिंपरीत आंबेडकर कडाडले...

Chandrapur : अठरापगड जातीतील प्रत्येक जातीत पुजारी आहेत. पण त्यांचे पुजारीपण नाकारले जाते.

संदीप रायपूरे

Prakash Ambedkar News : आपल्या व्यवस्थेत जातिनिहाय पुजारी ठेवण्याची व्यवस्था आहे. पण ती केवळ एका जातीपुरती आहे. अठरापगड जातीतील प्रत्येक जातीत पुजारी आहेत. पण त्यांचे पुजारीपण नाकारले जाते. यामुळे जातपूजारी ही व्यवस्था बंद करून अठरापगड जातीतील पुजाऱ्यांना पुजारीपणाची संधी द्यावी, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले.

चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur) गोंडपिपरी येथे तालुका बौद्ध महासभेच्यावतीने विराट धम्म मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. नवी दिल्ली (New Delhi) येथील भंते करूणासागर, महाथेरो आदिवासी अभ्यासक डॉ. विनायक तुमराम, माजी राज्यमंत्री रमेश गजबे, प्रा.दिलीप चौधरी, छाया कुरूडकर, भूषण फुसे, संदीप करपे, रूपचंद फुलझेले, विनोद चांदेकर आदींची यावेळी उपस्थिती होती. यापुढे पुढे बोलताना प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. संघाला पर्यायाने सत्ताधा-यांना प्रश्न विचारणाऱ्यांना सरसकट जेलमध्ये टाकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे अतिशय घातक असून याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपणास अतिशय सतर्क रहावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

नोटबंदी देशावरचे मोठे संकट होते हे आता स्पष्ट झाले झाले आहे. नोटाबंदीचा अधिकार सरकारला आहे हे की रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला असा सवाल न्यायालयाने सरकारला विचारला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांतील लोकांचा सत्कार करण्यात आला. आपल्या मार्गदर्शनातून बाळासाहेबांनी विविध मुद्द्य़ांवर भाष्य केले. सत्ताधारी काँग्रेस व भाजपने या देशातील शिक्षण व्यवस्थेवर पद्धतशीरपणे अटॅक केला आहे. दर पाच वर्षांनी शिक्षणाचा पॅटर्न बदलला जात आहे. यामुळे येणारी पिढी पोखरत चालली असा घणाघाती आरोपही ॲड. आंबेडकर यांनी केला.

देशातील चार मोठ्या उद्योगपतींना मालदार करण्याचे काम सुरू आहे. ही अतिशय धोक्याची घंटा असून बाबासाहेबांनी मांडलेली आर्थिक लोकशाही रुजविण्याची गरज असल्याचे यावेळी आंबेडकर म्हणाले. असे न केल्यास देश रसातळाला जाण्यास वेळ लागणार नाही, असेही ते म्हणाले. याप्रसंगी हजारोंच्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT