Eknath Shinde, Bacchu Kadu, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Bacchu Kadu, Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Bacchu Kadu News : बच्चू कडूंच्या प्रयत्नांना शिंदे-फडणवीस साथ देणार का?

सरकारनामा ब्युरो

Amravati News : महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी काही अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिवसेनेत फूट पडली. त्यावेळी शिंदे गटात शिवसेनेचे ४० आमदारांससह १० अपक्ष आमदाराही सहभागी झाले होते. त्यात आमदार बच्चू कडू महाविकास आघाडीतील मंत्रीपद असतानाही सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी माझ्या मतदारसंघासह परिसराचा विकास करण्याचे कारण दिले होते.

दरम्यान, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (State Goverment) स्थापन झाले. त्यात सरकारमध्ये मंत्रीपद मिळेल, अशी आशा आमदार कडू यांना होती. मात्र त्यांना मंत्रीमंडळात समावून घेण्यात आले नाही. अद्यापही मंत्रीमंडळ विस्तार होणे बाकी आहे. त्यामुळे कडू यांची आशा कायम आहेत.

दरम्यान बच्चू कडू (Bacchu Kadu) अचलपूर येथील फिन्ले मिल्स सुरू करण्याबाबत अनेक दिवसांपासून प्रयत्नशिल आहेत. त्या मिलसह इतर विकासासाठी आमदार बच्चू कडू यांना शिंदे-फडणवीस सरकार साथ देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या मिल्सबाबत केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे आश्वासन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिन्ले मिल्स हे ग्रामीण भागातील उद्योग आहे. येथे अनेक कामगार काम करत होते. कोविड काळातील अडचणीमुळे ही मिल बंद झाली आहे. याचा परिणाम येथील कामगारांच्या रोजगारांवर झाला आहे. त्यामुळे ही मील सुरू करण्यासाठी आमदार बच्चू कडू प्रयत्न करीत आहेत. या मिलबाबत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री यांच्याशी चर्चा करून राज्यशासन सकारात्मक निर्णय घेईल, असे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले आहे.

वस्त्रोद्योग मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती (Amaravati) जिल्ह्यातील अचलपूर येथील फिन्ले मिल्स सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी आमदार बच्चू कडू, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्रसिंग, राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाचे (नवी दिल्ली) अध्यक्ष व सरव्यवस्थापकीय संचालक आशुतोष गुप्ता संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, "मिल सुरू होईपर्यंत कामगारांना अर्धापगार देण्यासंदर्भात उपाययोजना करणे आवश्यक आहे. याबाबत केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री यांच्याशी चर्चा करून यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. ही मिल पूर्ववत सुरू होण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल."

या आश्वासनानंतर शिंदे-फडणवीस सरकार ही मिल सुरू करण्यासाठी काय उपाययोजना करतात, त्यातून ते अपक्ष आमदार कडू यांना कशी साथ देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited By Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT