Amit Shaha On Mahayuti Sarkarnama
विदर्भ

Mahayuti News : महायुती एकत्र लढणार की नाही? अमित शहांनी स्पष्टचं सांगितलं

Amit Shaha On Mahayuti in Maharashtra Assembly Election : लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी अजित पवार 40 आमदार घेऊन महायुतीत सहभागी झाले होते. लोकसभेच्या निवडणुकीत याचा मोठा फायदा होईल असे भाजपसह सर्वच पक्षांना वाटत होते. मात्र, महाराष्ट्रात निकाल वेगळे आले. महायुतीला विशेषतः फायदा हण्याऐवजी अधिकच नुकसान झाले.

Rajesh Charpe

Nagpur News, 24 Sep : महायुती (Mahayuti) विधानसभेची निवडणूक एकत्रच लढणार का? अजित पवार यांना सोबत ठेवणार का? असे असंख्य प्रश्न रोज उपस्थित होत आहेत. विरोधकही यात आणखी भर टाकत आहेत.

अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न भाजप आणि शिवसेनेच्यावतीने केले जात असल्याचाही आरोप होत आहेत. अशातच मंगळवारी (ता.24 सप्टेंबर) भाजपचे नेते तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांनी स्पष्टपणे महायुती एकत्रच लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता संवाद बैठकीत त्यांनी भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांसुद्धा कुठलाही भेदभाव न करता तसेच मनात किंतू परंतु न ठेवता महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन केले.

अमित शहा यांच्या वक्त्याव्यानंतर महायुतीबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांना पूर्णविराम मिळाला आहे. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी अजित पवार 40 आमदार घेऊन महायुतीत सहभागी झाले होते. लोकसभेच्या निवडणुकीत याचा मोठा फायदा होईल असे भाजपसह सर्वच पक्षांना वाटत होते. मात्र, महाराष्ट्रात निकाल वेगळे आले.

महायुतीला विशेषतः फायदा हण्याऐवजी अधिकच नुकसान झाले. स्वत: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे काँग्रेसचे एकच खासदार निवडून आले. भाजपला सर्वाधिक फटका विदर्भात (Vidarbha) बसला होता. त्यानंतर अजित पवारांमुळे भाजपचे नुकसान झाल्याचे निष्कर्ष काढला जात होता. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी विधानसभेची निवडणूक अजित पवार यांनासोबत घेऊन लढू नये, अशी जाहीर मागणी केली होती.

मध्यंतरी शिवसेनेच्या अनेक नेत्यांनीसुद्धा अजित पवार यांच्यावर थेट टीका केली होती. त्यामुळे महायुतीत मोठा विसंवाद असल्याचे दिसून येत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीसुद्धा जाहीर कार्यक्रमांमधून महायुतीमधील कुठलाही घटकपक्ष दुखावणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना केली होती.

टीका करताना त्याचा परिणाम महायुतीवर होणार नाही हेसुद्धा लक्षात ठेवावे असे आवाहन केले होते. असे असले तरी महायुती विशेषतः अजित पवार विधानसभेत एकत्रित लढेल की नाही याविषयी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंका कायम होती. अमित शहा यांनी आम्ही सर्व एकत्रच लढणार असल्याचे जाहीर केल्याने आता शंकाकुशंकांना पूर्णविराम मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT